माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 31 January 2022

कारणे सांगा ( सामान्य विज्ञान )



 (१) वाळवंटी प्रदेशात घोळदार अंगरखे वापरतात.

--- वाळवंटी प्रदेशात हवामान उष्ण असते. तसेच सगळीकडे रेताड जमीन असते. म्हणून ऊन आणि रेतीपासून संरक्षण मिळावे यासाठी वाळवंटी प्रदेशात घोळदार अंगरखे वापरतात.

-----------------------------------
 (२) सैनिक नेहमी मजबूत कापडाचे कपडे वापरतात.

--- सैनिकांना शारीरिक कष्टाचे जीवन जगावे लागते. त्यांना मैदाने, जंगले, दऱ्या-खोऱ्या, डोंगरात तसेच अतिशीत प्रदेशांत वावरावे लागते. सैनिकांचे कपडे टिकावेत व त्यांना संरक्षण मिळावे म्हणून सैनिकांना नेहमी मजबूत कापडाचे कपडे वापरावे लागतात. 

---------------------------------------------------------
(३) अग्नीजवळ किंवा यंत्राजवळ काम करणाऱ्या कामगारांचे कपडे अंगाभोवती नेमके बसणारे व अग्निरोधक कापडापासून तयार केलेले असतात. 

---  कारखान्यातील कामगारांना अग्नीजवळ, भट्टीजवळ किंवा यंत्राजवळ काम करावे लागते. अशा वेळी कपड्याचा कोठलाही भाग मोकळा राहून अपघात होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यांना आगीपासून धोका असतो. त्यांचे आगीपासून आणि अपघातांपासून संरक्षण व्हावे म्हणून अग्नीजवळ किंवा यंत्राजवळ काम करणाऱ्या कामगारांचे कपडे अंगाभोवती नेमके बसणारे व अग्निरोधक कापडापासून तयार केलेले असतात.

---------------------------------------------------------
(४) सैनिकांच्या कपड्याचा रंग परिसराशी मिळता-जुळता असतो.

---- सैनिकांचे कपडे परिसराशी मिळते-जुळते असल्यावर ते शत्रुला चटकन दिसून येत नाही. शत्रूच्या नजरेतून निसटण्यासाठी हे फायदयाचे ठरते. सैनिकांच्या कपड्याचा रंग परिसराशी मिळता-जुळता असणे संरक्षणाच्या दृष्टीने फायदयाचे ठरते. म्हणून सैनिकांच्या कपड्याचा रंग परिसराशी मिळता-जुळता असतो.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
      केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
     ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment