माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 21 February 2022

वाक्यातील काळ ओळखा.(मराठी व्याकरण )



दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा व लिहा.

(१) सुप्रिया चित्र काढते.
उत्तर -- वर्तमानकाळ

(२) सुमितने चित्र काढले.
उत्तर -- भूतकाळ

(३) आदित्य चित्र काढील.
उत्तर -- भविष्यकाळ

(४) रोहिणी शाळेत जाते.
उत्तर -- वर्तमानकाळ

(५) ललिता शाळेत गेली.
उत्तर -- भूतकाळ

(६) सृष्टी शाळेत जाईल.
उत्तर -- भविष्यकाळ

(७) आर्यन अभ्यास करतो.
उत्तर -- वर्तमानकाळ

(८) धिरजने अभ्यास केला.
उत्तर --  भूतकाळ

(९) आम्ही अभ्यास करू.
उत्तर -- भविष्यकाळ

(१०) सुरेश पुस्तक वाचतो.
उत्तर -- वर्तमानकाळ

(११) विशालने पुस्तक वाचले.
उत्तर -- भूतकाळ

(१२) राज पुस्तक वाचील.
उत्तर -- भविष्यकाळ
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्राथमिक शिक्षक)
                जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
                केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment