माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 7 February 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली ( परिसर अभ्यास )



(१) झुरळाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा

(२) कोळी किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ

(३) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?
उत्तर -- चार

(४) बेडकाला किती पाय असतात ?
उत्तर -- चार

(५) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा

(६) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग

(७ ) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा

(८) सापाला किती पाय असतात ?
उत्तर -- पाय नसतात.

(९) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग

(१०) माशाला किती पाय अस्तात ?
उत्तर -- पाय नसतात.

(११) आंबा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी

(१२) पेरू या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- अनेक बिया

(१३)  जांभूळ या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी

(१४) सिताफळात किती बिया असतात ?
उत्तर -- अनेक बिया

(१५) आवळा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी

(१६) कोणत्या प्राण्याला कान  नसतात ?
उत्तर -- गांडूळ
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
    केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि‌. धुळे
    ९४२२७३६७७५

2 comments: