माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 12 February 2022

'शेकरू / काजवा / हरियाल ' यांची वैशिष्ट्य



(१) शेकरू 

शेकरूची वैशिष्ट्य :--

शेकरू म्हणजेच मोठी खार. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. झाडांच्या उंच माथ्यावरून उड्या मारत जाणारा हा शेकरू सहजासहजी दिसत नाही. दिवसभर दडून बसलेला शेकरू पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिसू शकतो. शिकारी पक्षी आणि बिबळे शेकरूला फस्त करतात. फळे व बिया खाणारा शेकरू झाडांवरच घरटे बांधून राहतो. महाराष्ट्रात भीमाशंकर अभयारण्यात आणि संपूर्ण पश्चिम घाट परिसरात शेकरू आहेत.
-------------------------------------------------------
(२) काजवा

काजव्याचे वैशिष्ट्य : --
काजवा हा एक छोटा कीटक आहे. त्याच्या शरीरातून उजेड निघतो. काही रासायनिक क्रियांमुळे हे चमकल्यासारखे दिसतात. गर्द झाडी असलेल्या ठिकाणी आणि ओलसर वातावरणात हे राहतात. पावसाळी दिवसात गावाकडे, जंगलात चकाकणाऱ्या काजव्यांनी भरलेली झाडे दिसतात. काजव्यांचा हा उजेड भक्ष्याला आकर्षित करायला किंवा आपल्याच पैकी इतर काजव्यांना जवळ बोलावण्यासाठी असतो. 

--------------------------------------------------------
(३) हरियाल 

हरियाल पक्ष्याची वैशिष्ट्य :--

हरियाल पक्ष्याला पिवळ्या पायाचे हिरवे कबुतर असे म्हणता येईल. हरियाल पक्षी हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. ही पक्ष्याची जात उंबर, अंजीर अशा फळांवर ताव मारत असते. सकाळच्या वेळी थव्याथव्यांनी हरियाल फळझाडांवर हल्ला करताना दिसतात. जानेवारीच्या सुमारास हरियालची मादी अंडी घालते. महिन्याभरात त्यातून पिल्ले बाहेर येतात. हरियालला जरी महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हटले असले, तरी तो संपूर्ण भारतात आढळतो.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
          केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
         9422736775

No comments:

Post a Comment