(1) दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतात ?
उत्तर --- 22 वेळा
--------------
(2) 12 :15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शविते ?
उत्तर --- दक्षिण
----------------
(3) पावणे तीन वाजता घड्याळातील काट्यांची स्थिती कशी असणार ?
उत्तर --- तास काटा 3 च्या जवळ व मिनिट काटा 9 वर.
--------------------------------
(4) 2 तास 5 मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर --- 125 मिनिटे.
--------------------------------
(5) साडेचार वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असतो ?
उत्तर --- 45 °
--------------------------------
(6) दोन तास 45 मिनिटात किती सेकंद आहेत ?
उत्तर --- 9900 सेकंद
--------------------------------
(7) दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती वेळा काटकोन होईल ?
उत्तर --- 11 वेळा
--------------------------------
(8) सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?
उत्तर --- 3 वेळा
--------------------------------
(9) एक डाॅक्टर एका गंभीर रूग्णाची तपासणी प्रथम
8 : 30 वाजता. नंतर 9 : 20 वाजता करतात. तिसऱ्या वेळी 10 : 30 वाजता. चौथ्या वेळी 12 वाजता करतात या हिशेबाने नंतरची तपासणी केव्हा करतील ?
उत्तर --- 1 : 50 वाजता
--------------------------------
(10) 24 तासांमध्ये घड्याळाचे तिन्ही काटे ( सेकंद, मिनिट, तास ) एकमेकांना किती वेळा भेटतील ?
उत्तर --- 24 वेळा
--------------------------------
(11) 24 ताशी कालमापन पध्दतीने रात्रीचे 10 वाजले असतील तर त्यास किती वाजले असे म्हणतात ?
उत्तर --- 22 वाजले.
--------------------------------
(12) एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात ?
उत्तर --- 86400 सेकंद
--------------------------------
(13) घड्याळात दुपार 3 : 30 वाजल्यापासून रात्री
9 : 30 पर्यंत किती वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो ?
उत्तर --- 5 वेळा
--------------------------------
(14) संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरू झालेले नाटक पावणेचार तासांनी संपले, तर नाटक किती वाजता संपेल ?
उत्तर --- 9 : 15 वाजता
--------------------------------
(15) भिंतीवरील एका 12 ताशी घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा दोन्ही काटे एकमेकांवर येण्याची स्थिती किती वेळा घडते ?
उत्तर --- 11 वेळा
--------------------------------
(16) एक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाचे एकूण सेकंद किती ?
उत्तर --- 4343 सेकंद
--------------------------------
(17) सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत किती वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर असतील ?
उत्तर -- 12 वेळा
--------------------------------
(18) घडाळ्याचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो ?
उत्तर --- 30°
--------------------------------
(19) घड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात कोनाचे अंश किती ?
उत्तर --- 90
--------------------------------
(20) एका घड्याळात सकाळी 6 : 30 वाजल्यापासून
सायंकाळी 6 : 30 वाजेपर्यंत तासकाटा व मिनिटकाटा
यात 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो ?
उत्तर --- 11 वेळा
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरताड गावठाण
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496
No comments:
Post a Comment