फुलपाखरे सर्वांना खूप आवडतात. विशेषत:
लहान मुलांना तर ती खूपच आवडतात.
भारतात फुलपाखरांच्या सुमारे १५०० प्रजाती
आहेत. प्रत्येक फुलपाखराची वनस्पती ठरलेली
असते. ते त्या वनस्पतींना येणाऱ्या फुलांकडूनच
रंगद्रव्य घेतात. त्यांच्या पंखांमध्ये एक गंमत
असते. उघडलेल्या पंखावर खूप आकर्षक रंग
दिसतात; परंतु मिटलेल्या पंखांची रंगछटा
फिकट असते, त्यामुळे फुलपाखरे झाडावर
पंख मिटून बसली, की आपल्याला ओळखू
येत नाहीत. अशा प्रकारे फुलपाखरे स्वतःचे
संरक्षण करतात. आणखी एक गमतीची गोष्ट
म्हणजे फुलपाखरांमुळे फळे तयार होतात,
हे तुम्हाला माहीत आहे का ? फुलपाखरे या
फुलावरून त्या फुलावर जाताना त्यांच्या
पायांना चिकटून एका फुलातील परागकण
दुसर्या फुलात जातात. आणि फुलाचे फळात
रूपांतर होते. अशा तर्हेने फलधारणेच्या कामात
फुलपाखरे मदत करतात. अशी ही फुलपाखरे
सगळ्यांना का आवडणार नाहीत.
महाराष्ट्रात नाशिक, रत्नागिरी, मुंबई येथे
फुलपाखरांची स्वतंत्र उद्याने आहेत.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे( प्रा. शिक्षक)
जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
ब्लॉग भेटी.
Monday, 12 February 2018
फुलपाखरांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती घेऊ या !
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment