माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 8 February 2018

उतारा ऐका व सांगा.

 
(१) हा माझा भारत देश .
     छान छान माझा देश.
     देशात गावे आहेत.
     गावात माणसे आहेत.
     गावात नदी आहे.
-----------------------------------
(२) घरातील केर दारात नको.
      दारातील केर रस्त्यात नको.
      सारा केर उचलू या.
      कचराकुंडीत टाकू या.
      गाव स्वच्छ ठेवू या  !
-----------------------------------
(३) थंड हवा सकाळची.
      गरम हवा दुपारची.
     गार हवा रात्रीची.
      ही तर जादू सूर्याची.
      नाही कधीच संपायची  !
----------------------------------
(४) दातांना मंजन लावावे.
     स्वच्छ तोंड धुवावे.
     दररोज अंघोळ करावी.
     वाढलेली नखे काढावीत.
     स्वच्छ कपडे घालावेत.
----------------------------------
(५) ही पाहा माझी शाळा.
     शाळेभोवती बाग आहे.
     बागेत फुलांची झाडे आहेत.
     आम्ही झाडांना पाणी घालतो.
     आम्ही बागेतील गवत काढतो. 
=======================
 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता. साक्री जि.धुळे
                 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment