माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 30 June 2018

प्रश्न मराठीत - उत्तर इंग्रजीत सांगा.  (सामान्यज्ञान)


(१) मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचे नाव सांगा.

----  Truck

(२) आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवावर घड्याळ घालतो ?

---- Wrist 

(३) आपण शरीराचा कोणता अवयव आंगठी घालण्यासाठी वापरतो .

---- Finger

(४) टीव्ही पाहताना शरीराचा कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?

---- Eyes

(५) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो  ?

----  Yellow

(६)  आकाशाचा रंग कोणता आहे  ?

----  Blue 

(७)शनिवार व सोमवार यांमध्ये कोणता दिवस येतो ?

---- Sunday

(८) शिक्षक यावर खडूने लिहितात  ?

----  Blackboard 

(९) कागद किंवा कापड कापण्यासाठी काय वापरले जाते  ?

----  Scissors

(१०) कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला निश्चित वेळ समजते  ?

----- Watch

(११) शरीरातील कोणता अवयव अन्नाची चव
        घेण्यासाठी उपयोगी पडतो  ?

---- Tongue
 
--------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Friday, 29 June 2018

अनुस्वारामुळे शब्दांच्या अर्थात बदल

  अनुस्वारामुळे शब्दांच्या अर्थात कसा बदल
होतो, हे लक्षात घ्या. पुढे दिलेल्या शब्दांतील
पहिल्या अक्षरावर अनुस्वार देऊन ते शब्द
पुन्हा लिहा.

    जसे  :   रग   -- रंग

(१ )  रग    --   रंग

(२)  नदी    --  नंदी

(३)  फड    --  फंड

(४)  राग     --  रांग

(५)  माडी    -- मांडी

(६)  आबा    --  आंबा

(७)  काडी    -- कांडी

(८)  हस     --   हंस

(९)  साग      --  सांग

(१०)  माड     -- मांड

(११)  सोड     --  सोंड

(१२)  दगा     --  दंगा

(१३)  जग      -- जंग

(१४)  कप      -- कंप

(१५)  गड      --  गंड

(१६)  कुडी     --  कुंडी

(१७)  खोड     --  खोंड

(१८)  भाग     --  भांग

(१९)  कबर    --  कंबर

(२०)   बाबू     --  बांबू
-------------------------------------------------
 लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Wednesday, 27 June 2018

वटवृक्ष आणि पर्यावरण

   वटवृक्षाची पाने मोठी, आकार मोठा, घेर
मोठा. या सर्वांचे पर्यावरणात महत्त्वही मोठं.
तो वृक्ष दीर्घायुषी असतो. त्याच्या पानावर
रंध्रेही जास्त असतात. रंध्रांतून कर्बद्विवायू
घेतला जातो. बाहेर प्राणवायू टाकला जातो.
प्राणवायू जास्त असतो. हा प्राणवायू हवेतील
विषारी वायूंची तीव्रता कमी करतो.पर्यावरणाला
बाधा ठरणाऱ्या कर्बद्विवायुचे शोषण ही पानं
करतात. प्राणवायूमुळे हवा शुध्द होते. ही शुध्द
हवा त्याच्यावर राहणाऱ्या पाखरांना, कीटकांना
मिळते. झाडाखालच्या मुशाफिराला मिळते.
   वटवृक्षाची हवाशुध्दी :- वटवृक्षाच्या एका
शास्त्रीय पाहणीत असे दिसले की, एक मोठे
वडाचे झाड दररोज २ टन पाणी बाहेर फेकते.
हे पाणी बाष्परूपात असते. त्याचे ढग बनतात.
हा वृक्ष ६.८८ टन लाकूड तयार करण्याला
१०.१६ मि. मी. पावसाची गरज असते. ज्या
वटवृक्षाची छाया १६० चौ. मी. आहे. त्या
वृक्षाची पाने जमिनीवर पसरली तर त्याचे
क्षेत्रफळ १० हेक्टर भरेल. हे वडाचे झाड
तासाला  ७१२ किलो एवढा प्रचंड प्राणवायू
हवेत सोडतो. त्यामुळे हजारो जीव श्वसन
करतात. तसेच घातक कर्बद्विवायू हा वृक्ष
ग्रहण करतो.
      गुजरातेतील एक प्रचंड वटवृक्ष आहे.
त्याखाली बसून कबीराने दोहे रचले. तो
भडोचपासून १५ - १६ किलोमीटर अंतरावर
आहे. त्याचा घेरा २००० चौ. फूट असून
एकावेळी ५०००  लोक त्याच्याखाली बसू
शकतात.
  वटवृक्ष- पक्ष्यांचे आश्रयस्थान :- अनेक वर्षे
जगणारा, अनेक पारंब्याचा हा वृक्ष अनादि
काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी त्याचा उपयोग
घरे बांधण्यासाठी, आसरा म्हणून करीत. त्याची
पाने अंगाला लपेटत. जळणाचे लाकूड
त्यापासून मिळे. अनेक फांद्यांवर अनेक पक्ष्यांची
घरटी असतात. उंच भरा-या मारणारा गरूडही
येथे राहतो तर चिमुकल्या जीवाच्या चिमण्याही
यावर राहतात.
     वडाच्या या असंख्य उपकाराची फेड
करण्यासाठी त्याची आपण पूजा करतो.
पूजा करताना अनायासे पाणी देणे,
संरक्षणासाठी पार बांधणे. खत टाकणे या
क्रिया येतात. झाड चांगले वाढते. अधिक काळ
टिकते.  पर्यावरणाची शुध्दी करते.
  वटपौर्णिमेच्या निमित्ताने या वृक्षाला माझे
शतशः प्रणाम !!"
   

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Saturday, 23 June 2018

🌞 दोघांमध्ये फरक वेगळा🌙


--------------------------------------------------

(१)●फुलामध्ये पाकळ्या असतात.
   
     ● पुस्तकामध्ये पाने असतात.
-------------------------------------------------
(२)●पोस्ट आॅफिसमध्ये पत्राची आवक
      जावक असते.

     ● बँकेमध्ये पैशांची आवक जावक असते.
------------------------------------------------
(३)● सुरीचे कार्य  'कापणे ' असते.

     ● सुईचे कार्य  ' शिवणे असते.
--------------------------------------------------
(४)● आकाशात विमान प्रवास करते.

     ● समुद्रात जहाज प्रवास करतात.
--------------------------------------------------
(५)● भाजीचे वजन किलोग्रॅममध्ये करतात.

     ● दुधाचे मोजमाप लीटरमध्ये करतात.
---------------------------------------------------
(६)● गायक या कलाकृतीच्या कार्यक्रमास
     ' जलसा ' म्हणतात.

    ● नाटक या कलाकृतीच्या कार्यक्रमास
     ' प्रयोग ' म्हणतात.
--------------------------------------------------
(७)● सुरीची कडा धारदार असते.

     ● सुई टोकदार असते.
--------------------------------------------------
(८)● पंखा विजेवर चालतो.

    ● स्टोव्ह चालण्यासाठी रॉकेल लागते.
--------------------------------------------------
(९) ● मधमाशीपासून मध मिळते.

     ● रेशीमकिड्यापासून रेशीम मिळते.
-------------------------------------------------
(१०)● लांबी मोजण्याचे लहानात लहान एकक
       ' मिलिमीटर ' आहे.
 
      ●वेळ मोजण्याचे लहानात लहान एकक
       'सेकंद आहे.
--------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Friday, 22 June 2018

फक्त दोन नावे सांगा ? (सामान्यज्ञान)


(१) पाण्यात विरघळणारे पदार्थ --
 -----  मीठ,  साखर

(२) उष्णता दिल्याने उकळणारे पदार्थ.
----- पाणी,  तेल.

(३)  लवकर बाष्पीभवन होणारे पदार्थ.
----- राॅकेल,  पेट्रोल.

(४) उष्णता दिल्याने वितळणारे पदार्थ.
----  बर्फ,  आइस्क्रीम

(५) पाण्याचे स्रोत.
---- विहीर,  नदी.

(६) समुद्रातून मिळणारे उपयुक्त पदार्थ.
---- मीठ,  मासे.

(७) हवेमध्ये असणारे वायू.
---- आॅक्सिजन,  नायट्रोजन.

(८) खनिज तेलापासून मिळणारे इंधने.
---- पेट्रोल ,  राॅकेल.

(९) नैसर्गिक आपत्ती.
---- भूकंप,  चक्रीवादळ.

(१०) वीज वाहून नेण्यासाठी कोणत्या धातूच्या
      तारांचा वापर होतो ?
----तांबे ,  अॅल्युमिनिअम.

(११) भूगर्भातून कोणकोणते पदार्थ मिळतात  ?
---- धातुपाषाण, दगडी कोळसा.

(१२) साखर उद्योगास लागणारा कच्चा माल .
---- ऊस , बीट

(१३) पारंपरिक ऊर्जासाधने .
---- दगडी कोळसा,  खनिज तेल.

(१४) अपारंपरिक ऊर्जासाधने.
---- सूर्यप्रकाश, वारा.

(१५) स्थायू पदार्थ.
----  दगड,  कागद.

(१६) द्रव पदार्थ.
----  पाणी,  ताक

(१७) वायू पदार्थ.
----  हवा,  आॅक्सिजन.
============================
संकलक:- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
             केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Wednesday, 20 June 2018

योग व योगाभ्यासविषयी माहिती.


● योग म्हणजे काय  ?
    दैनंदिन जीवनात कोणतीही कृती करताना
त्या कृतीशी आपण जोडले जातो. त्या विशिष्ट
कृतीशी जोडले गेल्याशिवाय आपण ती कृती
करूच शकत नाही. उदा. , (१)आपल्याला
भूक लागली आहे. याची जाणीव होणे म्हणजे
भूकेशी जोडले जाणे. त्यासाठी अन्नग्रहण
करताना अन्नग्रहणाच्या क्रियेशी जोडले जाणे.
उदा., (२)लेखन करण्यासाठी पेन हातात धरणे
म्हणजे पेनशी जोडले जाणे इत्यादी. अशा
प्रकारे दैनंदिन जीवनात आपण अनेक घटना,
क्रिया, विचार यांच्याशी जोडले जातो. हे
जोडले जाणे म्हणजे योग.
  जोडले जाणे, संयोग पावणे. हा संयोग
कशाचा ? तर आपण स्वतः स्वतःशी जोडले
जाणे, म्हणजे स्वतःची ओळख करुन घेणे.
याचाच अर्थ शरीर व मन यांचा संयोग होणे.
  आपल्या व्यक्तीमत्वाचे शारीरिक, मानसिक,
भावनिक, अध्यात्मिक व सामाजिक असे
विविध पैलू असतात. या सर्व पैलूंमध्ये
संतुलन प्राप्त करण्यासाठी उपयुक्त पद्धती
म्हणजे ' योगाभ्यास '.
  ● योगाची अंगे :-
   १. यम :-  आचरण /वर्तनविषयक
   २. नियम :- आत्मशुध्दी.
   ३. आसन :- शारीरिक व मानसिक स्थिती.
   ४.प्राणायाम  :- श्वास.
   ५. धारणा  :- चिंतन.

■ योगाभ्यासाचे फायदे  :-
 १. शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता
    वाढते.
 २. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 ३ रक्त शुध्द व प्रवाही राहते.
 ४.पाठीचा कणा लवचिक राहातो.
 ५. शरीर लवचीक बनते.
 ६.काम करण्याचा उत्साह वाढतो.
 ७.मनःशांती मिळते.
 ८.एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित होण्यास
   मदत मिळते.

संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
              केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Tuesday, 19 June 2018

पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग


(१) म्हैस --
----- दूध देते, तिचे शेण जमीन सारवण्यास व
    खत म्हणून उपयोग.

(२) रेडा ---
----- नांगर ओढण्यास.

(३) बकरी --
---- दूध देते,  मांसाचा उपयोग अन्न म्हणून.

(४) मेंढी --
---- केसांचा उपयोग लोकर म्हणून उबदार
    कपडे तयार करण्यास,  मांसांचा उपयोग
    अन्न म्हणून.

(५) घोडा --
---- पाठीवर बसून प्रवास करण्यास, टांगा
     ओढण्यास, परदेशीत जमीन नांगण्यास.

(६) गाढव --
---- ओझी वाहून नेण्यास.

(७)  उंट --
---- वाळवंटात व रेताड प्रदेशात माल व
     माणसे वाहून नेण्यास.

(८) सांडणी --
---- वाळवंटात लोकांना दूध देण्यास,
     वाहतूकीकरिता.

(९) गाय --
---- दूध देते, तिचे शेण जमीन सारवण्यास व
     खत म्हणून उपयोग.

(१०) मांजर --
---- घरातील उंदीर मारण्यास.
--------------------------------------------------

     संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५


   
  

Monday, 18 June 2018

ऐकूया , कृती करूया  ( सूचना )


(१) सर्वजण उभे राहा.
     सर्वजण खाली बसा.
     डोळे मिटून शांत बसा.

(२) सर्वजण उभे राहा.
     उजवा हात पुढे करा.
     डावा हात पुढे करा.
     उजवा हात वर करा.
     डावा हात वर करा.
     दोन्ही हात खाली करा.

(३) उजवा हात डोक्यावर ठेवा.
     डावा हात डोक्यावर ठेवा.
     दोन्ही हात खाली घ्या.

(४) एक टाळी वाजवा.
      दोन टाळ्या वाजवा.

(५) सगळेजण उभे रहा.
     स्वतःभोवती फिरा.
     उडी मारून खाली बसा.

(६) सर्वजण गोलाकार उभे रहा.
     मी गाण्याची एकेक ओळ म्हणेन.
     तुम्ही गाणे नीट म्हणा.
     माझ्यामागे गाणे म्हणा.

(७) गोलाकार बसा.
     दोन्ही हात वर करा.
     एक टाळी वाजवा.
     दोन्ही हात खाली घ्या.
     दोन टाळ्या वाजवा.

(८) ताठ उभे राहा.
     दोन्ही हात पुढे करा.
     दोन्ही हात वर करा.
     दोन्ही हात बाजूला करा.
     हात खाली घ्या.

(९) बालभारतीचे पुस्तक काढा.
     पहिला धडा काढा.
     मी धडा वाचतो.
     तुम्ही माझ्यामागून वाचा.

(१०) कागद घ्या.
       कागदाची घडी घाला.
       घडी बोटान नीट दाबा.
       घडीवर कागद फाडा.

(११) दप्तर आवरा.
       आवरून नीट ठेवा.
       दप्तर घेऊन उभे रहा.
       ओळीने बाहेर चला.
        शांतपणे घरी जा.
       उद्या दहा वाजता शाळेत या.
-------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Saturday, 16 June 2018

ओळखा पाहू मी कोण  ?

(१) मी आहे फळांचा राजा.
       माझ्यामध्ये एक बी,
       नंबर माझा पहिला.

(२) मी वरून काटेरी,
      आत रसाळ गोड,
      माझी जागा झाडाचे खोड.

(३) मी हिरवे गवत खाते,
      तुमच्या बाळांसाठी पौष्टिक दूध देते.

(४) घराची, शेतीची तुमच्या राखण करतो.
       चोराला मात्र पळवून लावतो.

(५) माझ्या अंगावरचे काढून केस,
       उबदार स्वेटर तुम्ही विणा भराभर.

(६)गवत, काड्या, कापूस यांचा करून वापर,
      घरटी बांधतो आम्ही भरभर.

(७) माझ्या शरीराचा मोठा आकार,
      पक्षी असूनही धावतो वेगाने फार.

(८) मी असतो जमिनीत पण तरी आहे
       झाडाचा आधार.

(९) मी असतो नेहमी पाण्यात.
       पण गणना होत नाही माशात,
       माझे नाव राष्ट्रीय फुलात.

(१०) माझे खोड लवचीक फार,
        मला लागतो दुसर्‍यांचा आधार
--------------------------------------------------

 उत्तरे :-(१) आंबा,  (२)फणस,  (३) गाय.
          (४) कुत्रा,   (५) मेंढी,    (६) पक्षी
          (७) शहामृग, (८) मुळं, (९) कमळ
          (१०) वेल.

 संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
               केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Wednesday, 13 June 2018

शैक्षणिक घोषवाक्य

(१) गिरवू अक्षर , होऊ साक्षर.

(२) शिकाल तर टिकाल.

(३) मोळी विकू पण शाळा.

(४) मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.

(५) बालकांचे शिक्षण, देशाचे रक्षण.

(६) लेक माझी गुणाची, ओढ लागली ज्ञानाची.

(७) नियमीत पाठवतो शाळेत बालक ,
     तोच खरा आदर्श पालक.

(८) आई मी शाळेत जाणार ,
      शिकून घराला पुढे नेणार.

(९) शाळेत पाठव मुलींना माय ,
      घरी ठेवून करते काय.

(१०) लाजू नका, भिऊ नका.
       शिकायची संधी सोडू नका.

(११) आपल्या मुली जर शिकल्या छान ,
        होईल आपल्या देशाचे कल्याण.

(१२) शिक्षणाची धरूया कास,
       मुलींना शिकवू एकच ध्यास.

(१३)मुलगा, मुलगी एक समान ,
       द्यावे त्यांना शिक्षण छान.

(१४) मुलांना लावा शाळेची गोडी,
       बर्बाद होईल नाही तर पिढी.

(१५) चला धरूया शाळेची वाट,
       अज्ञानाचा करू नायनाट.

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा
            केंद्र - रोहोड, ता. साक्री. जि. धुळे
              ९४२२७३६७७५