(१) आग्रा :-
आग्रा हे शहर उत्तर प्रदेशात यमुना नदीच्या
काठावर वसलेले आहे. या शहराला प्राचीन
परंपरा आहे. आग्-याचा किल्ला आणि
ताजमहाल यांसारखी उत्कृष्ट वास्तू येथे
बांधण्यात आल्या आहेत. हे शहर पर्यटन केंद्र आहे.
--------------------------------------------------
(२) अहमदाबाद :-
अहमदाबाद हे गुजरात राज्यातील
महत्वाचे शहर आहे. कापडगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
--------------------------------------------------
(३) कोलकाता :-
कोलकाता हे पश्चिम बंगालची राजधानी
असलेले भारतातील सर्वात मोठे शहर आहे.
--------------------------------------------------
(४) चंदिगढ :-
चंदिगढ हे पंजाब व हरियाणा राज्याची
राजधानी असलेले शहर आहे.
--------------------------------------------------
(५) अंबाला :-
अंबाला हे शहर हरियाणामध्ये आहे.
लष्करीदृष्टया महत्वाचे शहर. लष्कर छावणी
आहे. भारतीय विमानदलाचे प्रशिक्षण केंद्र आहे.
--------------------------------------------------
(६) अमृतसर :-
अमृतसर हे सरहदीवरील पंजाब राज्यातील
महत्त्वाचे शहर आहे. शिखांचे चौथे गुरू
गुरू रामदास यांनी हे शहर वसविले. गुरू
अर्जुनदेव यांनी बांधलेले शिखांचे पवित्र
सुवर्णमंदिर येथे आहे.
--------------------------------------------------
(७) वाराणसी :-
वाराणसी हे उत्तरप्रदेशात गंगा नदीकाठी
वसलेले शहर आहे. बनारस व काशी नावाने
ओळखले जाते.
------------------------------------------------
(८) मुंबई :-
मुंबई हे शहर महाराष्ट्र राज्याची राजधानी
असलेले व सात बेटांनी बनलेले शहर आहे.
--------------------------------------------------
(९) हैदराबाद :-
हैदराबाद हे आंध्रप्रदेशाची/तेलंगणाची राजधानी असलेले शहर आहे. उस्मानिया विद्यापीठ व सालारजंग म्युझियम येथे आहे.
--------------------------------------------------
(१०) पुणे :-
' विद्येचे माहेरघर ' म्हणून ओळखले जाणारे
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे.
औद्योगिकदृष्टया विकसित असलेले शहर आहे.
खडकी येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना
आहे.
--------------------------------------------------
(११) दिल्ली :-
दिल्ली ही भारताच्या राजधानीचे शहर आहे .
नवी दिल्ली येथून संपूर्ण भारताचा प्रशासकीय
कारभार चालवला जातो. येथे राष्ट्रपती भवन,
संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, तिन्ही संरक्षण
दलांची मुख्यालये येथे आहेत.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ( धुळे )
📞९४२२७३६७७५