माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 11 November 2018

सूर्यमालेतील ग्रहांची माहिती


(१) बुध :-
       बुध हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे.
 सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त
 सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या
 ग्रहाभोवती उल्कापातामुळे निर्माण झालेले
 ज्वालामुखीच्या मुखासारखे खड्डे पहायला
 मिळतात. हा सर्वांत वेगवान ग्रह आहे.
--------------------------------------------------

(२) शुक्र :-
          शुक्र हा सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी
  ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी
 पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस
 पहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती
 पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात
 तप्त ग्रह आहे.
--------------------------------------------------

(३) पृथ्वी  :-
         पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे.
 पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी
 नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती
 चुंबकीय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रामुळे
 सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या
 ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात.
--------------------------------------------------

(४) मंगळ  :-
          मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.
 मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा
रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला 'लाल ग्रह'
असे ही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील
सर्वांत उंच व लांब पर्वत  'आॅलिम्पस माॅन्स '
हा आहे.
--------------------------------------------------

(५) गुरु :-
          गुरु हा सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह
आहे.  गुरूमध्ये सुमारे १३९७ पृथ्वीगोल सहज
मावतील इतका तो मोठा आहे. गुरू ग्रह
आकाराने प्रचंड असूनसुद्धा स्वतःभोवती फार
वेगाने फिरतो. गुरू ग्रहावर सतत प्रचंड वादळे
होत असल्याने त्यास  'वादळी ग्रह ' असेही
म्हणतात.
--------------------------------------------------

(६) शनी :-
            शनी हा सूर्यमालेतील सहावा ग्रह व
गुरू ग्रहानंतर सर्वांत मोठा ग्रह आहे. शनी एक
वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. कारण त्याच्या भोवती
कडी आहेत. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट
असतानाही त्याची घनता खूप कमी आहे.
समजा, एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी
ग्रह टाकला, तर तो चक्क तरंगू शकेल.
--------------------------------------------------

(७) युरेनस :-
            युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह
आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत
नाही. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला
असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो.
--------------------------------------------------

(८) नेपच्यून  :-
                नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा
ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे ४१
वर्षांचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान
वारे वाहतात.
 
=========================     
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              ( पिंपळनेर )  धुळे
             📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment