माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 28 November 2018

माहिती आहे का तुम्हांला  ?

(१) रबर हा एक नैसर्गिक पदार्थ विशिष्ट झाडांचा
      चीक (रस ) गोळा करून मिळवतात. रबराचे
     झाड ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणावर
     आढळते. नंतर या झाडाची लागवड इतर
      देशांत करण्यात आली. भारतात रबराचे
      उत्पादन  ' केरळ ' राज्यात होतो.
--------------------------------------------------

(२) भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार
      करणारा पहिला कारखाना १९५५ मध्ये
      नेपानगर  (मध्यप्रदेश ) येथे स्थापन झाला.
      सोनगढ  (गुजरात ) येथेही कागद तयार
      होतो.  महाराष्ट्रात बल्लारपूर येथे कागद
      कारखाना आहे.
--------------------------------------------------

(३)  ATM  कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादींमध्ये
       एक चुंबकीय पदार्थाची पट्टिका असते.
       त्यामध्ये तुमची आवश्यक माहिती साठलेली
       असते.
      कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, आॅडिओ, व्हिडिओ,
       सीडी यांमध्ये चुंबकीय पदार्थाचा वापर माहिती
       (Data ) साठवण्यासाठी केला जातो.

==============================

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
                 पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
                 ९४२२७३६७७५ 
      

No comments:

Post a Comment