माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 1 August 2020

काव्यात्मक जोडशब्द साखळी



गडकिल्ले जीर्णशीर्ण गडकोट

राजेमहाराजे गरीबश्रीमंत भेटगाट

पडझड कानाकोपरा कडेकोट
डागडुंजी अवतीभवती झाडलोट

वृक्षवेली ठावठीक थाटमाट
दगडधोंडा तोडफोड फाटाफूट

कडेकपारी रमतगमत पाऊसपाणी
झाडेझुडपे जीवजंतू हवापाणी

धनदौलत धनधान्य चारापाणी
शेतीवाडी कांदाभाकरी दाणापाणी

भाजीपाला पालापाचोळा नदीनाला
बागबगीचा गुरेढोरे जमीनजुमला

रंगरूप साजिरागोजिरा रूपसुंदर
किडूकमिडूक लतावेली साजशृंगार

गोडधोड तिखटमीठ घरदार
डामडौल कपडालत्ता सणवार

रीतिरिवाज देवधर्म काळवेळ
जुनापुराणा दागाधोरा ताळमेळ

सोनेनाणे वजनमापे दिवाबत्ती
जडीबुटी रोगराई सुखशांती
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment