माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 3 August 2020

दिलेल्या शब्दावरून तीन - तीन वाक्य बनवा. (मराठी भाषिक उपक्रम )

● पोपट, मांजर, गाय, वाघ, कावळा,
मोर, कोकिळ, मेंढी, हत्ती, खार.

(१) पोपट
--- पोपट हा सुंदर पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवागार असतो.
पोपटाची चोच लालभडक, बाकदार व धारदार असते.
-----------------------------------------------------
(२) मांजर
--- मांजर हा पाळीव प्राणी आहे.
मांजरीच्या अंगावर मऊ केस असतात.
मांजर म्याव म्याव करून ओरडते.
-----------------------------------------------------
(३) गाय
--- गाय हा पाळीव प्राणी आहे.
गायीचा रंग पांढरा , तांबुस किंवा काळा असतो. गाय दूध देते.
-----------------------------------------------------
(४) वाघ
--- वाघ जंगली प्राणी आहे.
वाघ हा शक्तिशाली प्राणी आहे.
वाघ जंगलातील प्राण्यांची शिकार करून खातो.
-----------------------------------------------------
(५) कावळा
--- कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे.
कावळ्याचा रंग काळा असतो.
कावळा काव - काव असे ओरडतो.
-----------------------------------------------------
(६) मोर
---- मोर हा सुंदर पक्षी आहे.
मोर रानात राहतो.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
-----------------------------------------------------
(७) कोकिळ
--- कोकिळ हा मधुर आवाजाचा पक्षी आहे.
कोकिळ रंगाने काळा कुळकुळीत असतो.
कोकिळ झाडावर, आमराईत राहतो.
-----------------------------------------------------
(८) मेंढी
--- मेंढी हा पाळीव प्राणी आहे.
मेंढी बुटकी असते.
मेंढी बें बें करून ओरडते.
-----------------------------------------------------
(९) हत्ती
--- हत्ती हा जंगली प्राणी आहे.
हत्ती शरीराने प्रचंड मोठा असतो.
हत्तीचे पाय खांबासारखे जाड व कान सुपासारखे मोठे असतात.
-----------------------------------------------------
(१०) खार
--- खार हा एक चिमुकला प्राणी आहे.
खार आकाराने लांबट असते.
खार झाडावर आपले घर तयार करते.
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment