(१) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर --- राई
(२) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा
(३) पक्ष्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे
(४) 'पाडस' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर -- हरणाच्या
(५)गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर --. शिंगरू
(६) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ
(७) 'खुराडा' कोणाच्या घरास म्हणतात?
उत्तर -- कोंबडीच्या
(८) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे
(९) वाघाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा / बछडा
(१०) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा
(११) जादूचे खेळ करून दाखवणा-याला काय म्हणतात ?
उत्तर -- जादूगार
(१२) चार रस्ते एकत्र येतात त्या जागेस काय म्हणतात ?
उत्तर -- चौक
(१३) घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु
(१४) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेट
(१५) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment