माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 28 May 2022

का व कसे ? (भूगोल प्रश्नावली)



(१) तारे दिवसा का दिसत नाहीत? ते रात्रीच का दिसतात?

-- आपल्या सूर्यमालेतला तारा म्हणजे सूर्य. 
सूर्यापेक्षाही मोठे व तेजस्वी तारे आपल्या आकाशगंगेत
 आहेत. पण सूर्य हा तारा आपल्याला जवळचा आहे.
 तो विस्तारीत प्रकाश उगमस्थानासारखे काम करतो.
 म्हणून त्याच्यापासून निघणारा प्रकाश सर्व दिशांना 
पसरतो. सूर्य सोडल्यास इतर तारे आपल्यापासून खूप
 दूर आहेत. दिवसा सूर्याच्या तेजस्वितेमुळे इतर ताऱ्यांचे
 तेज कमी होते. सूर्यप्रकाशामुळे हे तारे पूर्णपणे झाकले जातात. त्यामुळे तारे दिवसा दिसत नाहीत. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ते रात्री दिसतात.
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जिल्हा धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment