माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 24 May 2022

का व कसे ? ( विज्ञान प्रश्नावली )



(१) सूर्यग्रहण अमावास्येला का होते?

----  पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येऊन पृथ्वी
 आणि सूर्य यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. मात्र प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही. कारण पृथ्वी, चंद्र आणि सूर्य समतलात फिरत नाहीत.
--------------------------------------------------------
(२)  गोबर गॅसमध्ये समाविष्ट असलेल्या वायूचे नाव काय?

-----  गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. शेण व पाणी एकत्र केल्यामुळे कुजण्याची क्रिया होऊन गोबर गॅसच्या टाकीत मिथेन वायू तयार होतो. हा वायू उत्कृष्ट इंधन 
म्हणून वापरला जातो.
--------------------------------------------------------
(३)  रडताना आपल्या नाकातून पाणी का येते?

----- आपल्या डोळ्यांत लेक्रिमल ग्रंथी या नावाची एक
 ग्रंथी असते. या ग्रंथीतून निघालेली एक नलिका आपल्या नाकात उघडते. आपण जेव्हा रडतो तेव्हा डोळ्यांतल्या लेक्रिमल ग्रंथीतून अश्रू वाहू लागतात. या अश्रूपैकी काही अश्रू लेक्रिमल ग्रंथीपासून निघालेल्या नलिकेतून नाकात येऊ लागतात. त्यामुळे आपल्या नाकातून पाणी यायला सुरुवात होते!
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment