माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 26 August 2022

ऊर्जा स्त्रोत ( नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत )



(१) सौर ऊर्जा :
 सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा पृथ्वीवर ही ऊर्जा प्रचंड प्रमाणात आणि अखंड स्वरूपात पोहोचत असते. सौर चुली, सौर जलतापक, सौर शुष्कक आणि सौर विदयुत घट ही सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे आता लोकप्रिय झाली आहेत. सौर विदयुत घटामुळे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करता येते.
---------------------------------------------------
(२) पवन ऊर्जा : 
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून पवनचक्कीमध्ये विदयुतनिर्मिती करता येते. या पवन ऊर्जेचा वापर निरनिराळ्या कामांसाठी करता येतो.
---------------------------------------------------
(३) सागरी ऊर्जा : 
भरती-ओहोटीच्या लाटांनी जनित्रे फिरवून लाटांपासून सागरी ऊर्जा निर्माण करता येते. अशी सागरी ऊर्जा समुद्रातील खाडीकडील चिंचोळा भाग निवडून तेथे भिंत बांधून निर्माण करतात.
---------------------------------------------------
(४)जल विद्युत ऊर्जा : 
धरणांमध्ये साठवलेले पाणी उंचावरून खाली आणून जनित्राची पाती फिरवली जातात. अशा जलविद्युत केंद्रात वीजनिर्मिती करण्यात येते. महाराष्ट्रातला कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
---------------------------------------------------
(५) समुद्रलहरींपासून मिळणारी ऊर्जा :
 समुद्राच्या वर-खाली होणाऱ्या लाटांपासून अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यात येते.
---------------------------------------------------
(६)अणू ऊर्जा :
 युरेनिअम, थोरिअम अशा जड मूलद्रव्यांच्या अणूंच्या विघटनातून निघणाऱ्या ऊर्जेला 'अणू ऊर्जा' असे म्हणतात.
=========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment