(१) अजिंठा, वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद
(२) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
(३) जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
(४) साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- नाशिक
(५) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर
(६) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई शहर
(७) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई
(८) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी
(९) महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- गडचिरोली
(१०) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि. मी. आहे ?
उत्तर -- ७२० कि. मी.
(११) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(१२) कसारा घाट कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे ?
उत्तर -- मुंबई -- नाशिक
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment