माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 10 August 2022

ओळखा पाहू मी कोण ? (कोडे )



(१) जमिनीवर असतो, 
पाण्यातही राहतो,
 डराव डराव ओरडतो, 
ओळखा पाहू मी कोण ? 

उत्तर : बेडूक.
~~~~~~~~~~~~~
(२) रंग माझा काळा
गोड माझा गळा
कुहूकुहू गाणे माझे 
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- कोकिळ
~~~~~~~~~~~~~~
(३) सुपासारखे माझे कान, 
शेपूट आहे फार लहान
 पाने, ऊस माझे जेवण, 
ओळखा पाहू मी कोण ? 

उत्तर : हत्ती.
~~~~~~~~~~~~~~
(४) उंचाडी मान, फत्ताडे पाय
 वाकडी पाठ, डुगडुग जाय 
तुडवीत जातो वाळवंट
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : उंट.
~~~~~~~~~~~~~~~
(५) हिरवे हिरवे अंग माझे
लाल लाल चोच माझी
विठू विठू बोल माझे 
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- पोपट
~~~~~~~~~~~~~~~
(६) मला म्हणतात मनीमाऊ 
शरीर माझे मऊ मऊ
 मी करते म्यँव म्यँव 
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --  मांजर
~~~~~~~~~~~~~~~
(७) कात नाही, चुना नाही,
 तोंड कसे रंगले ? 
पाऊस नाही, पाणी नाही,
 रान कसे हिरवे?
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : पोपट.
~~~~~~~~~~~~~~~
(८) लांब चोच,
लांब मान,
पांढरा रंग,
लावतो ध्यान
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : बगळा.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment