माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 29 October 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली


(1) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?
उत्तर -- देवनागरी 

(2) फेसबुकचे संस्थापक कोण आहे ?
उत्तर -- मार्क झुकरबर्ग

(3) भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद 

(4) वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी 

(5) महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर -- नाशिक 

(6) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर -- बुध 

(7) 'साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक 

(8) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर -- कर्मवीर भाऊराव पाटील 

(9) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा 

(10) पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे ?
उत्तर -- नाथसागर 

(11) महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती ?
उत्तर -- सहा 

(12) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार 

(13)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
उत्तर -- महू (मध्यप्रदेश)

(14) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर -- यकृत 

(15)  भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा 
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

No comments:

Post a Comment