माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 23 September 2023

रोग / रोगांचे प्रकार ( सामान्यज्ञान )


(1) 'साथीचे रोग' कशास म्हणतात ?

---  (1) हवामान अचानक बदलले किंवा पिण्याचे पाणी दूषित झाले की, एकाच वेळी अनेकांना एकच रोग होतो. अशा रोगांना साथीचे रोग म्हणतात. (2) कॉलरा, विषमज्वर, इन्फ्ल्यूएंझा हगवण, डोळे येणे हे साथीचे रोग आहेत. 
=================

 (2) 'संसर्गजन्य रोग' कशास म्हणतात?

--- (1) रोग्याच्या सतत सहवासामुळे त्याच्या शरीरातले रोगजंतू हवेवाटे दुसऱ्या निरोगी माणसाच्या शरीरात शिरतात. अशा वेळी ज्या रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यांना संसर्गजन्य रोग म्हणतात. (2) सर्दी, खोकला, इन्फ्ल्यूएंझा हे संसर्गजन्य रोग आहेत.
=================

(3) क्षयरोग्याने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे का टाळावे ?

--- (1) क्षय हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. (2) भारतात दर दोन मिनिटांनी एक क्षय रोगपिडीत रुग्ण मरतो असा अंदाज आहे. (3) रोग्याच्या थुंकीतून क्षयकारक जीवाणू वातावरणात मिसळतात. (4) इतर लोकांना त्यामुळे क्षयाची बाधा होऊ शकते, म्हणून क्षयरोग्याने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.
=================

(4) कांजिण्या या रोगाचा प्रसार कसा होतो? त्याची लक्षणे कोणती? 
--- (1) कांजिण्यांचा प्रसार : कांजिण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. श्वासावाटे रोगाचा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातो. त्यामुळे कांजिण्यांचा प्रसार होतो. तसेच रोग्याच्या संपर्कामुळे, त्याची भांडी किंवा कपडे वापरल्यामुळेही कांजिण्यांचा प्रसार होतो.
(2) कांजिण्यांची लक्षणे : (1) कांजिण्यांच्या विषाणूंची लागण झाल्यावर खूप ताप येतो. (2) डोके दुखते. (3) त्वचेवर लहान लहान फोड दिसू लागतात. हे फोड पाण्याच्या फोडासारखे दिसतात. (4) थोड्या दिवसांनी त्या फोडांवर खपल्या येतात.
=================

(5) संपर्कजन्य रोग' कशास म्हणतात ?

--- (1) रोग्याच्या सतत संपर्कामुळे आणि स्पर्शावाटे त्याच्या अंगातील रोगजंतू निरोगी व्यक्तींच्या शरीरात शिरतात. अशा व्यक्तींमध्ये या रोगजंतूंचा प्रादुर्भाव होऊन त्यांना जे रोग होतात, त्यांना संपर्कजन्य रोग म्हणतात. (2) खरूज, इसब, गजकर्ण, कुष्ठरोग हे संपर्कजन्य रोग आहेत.
=================

(6) रेबीज हा रोग कशामुळे होतो? रेबीजची प्रमुख लक्षणे कोणती? 
--- पिसाळलेला कुत्रा चावल्याने रेबीज हा रोग होतो. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या लाळेतून रेबीजचे विषाणू निरोगी माणसाच्या शरीरात गेल्यास रेबीज हा रोग होतो. कुत्र्याप्रमाणेच माकड, मांजर, उंदीर व ससे हे इतर प्राणी चावल्यामुळेही रेबीजच्या विषाणूंचा प्रसार होतो.

रेबीजची लक्षणे : (1) रेबीजची लागण झाल्यावर ताप येतो व तीव्र डोकेदुखी होते. (2) रोग्याच्या घशाचे स्नायू आकुंचित होऊन ताठरतात. त्यामुळे वेदना होतात. (3) घशातील वेदनांमुळे रोगी पाणी किंवा इतरही पातळ पदार्थ गिळू शकत नाहीत. (4) पाण्याची भीती वाटून रोगी बेभानावस्थेत जातो. (5) रोग्याचे हातपाय लुळे पडून आकडी येऊ शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास रोगी दगावण्याची शक्यता असते.
======================
संकलन :- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496

No comments:

Post a Comment