माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 18 September 2023

नातेसंबंध प्रश्नावली ( बुद्धिमत्ता चाचणी‌ )


(१) माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते. तर तुझी आई माझी कोण ?

------ (1) आत्या
------ (2) मावशी
------ (3) मामी ✓✓
------ (4) काकी
==================
(२) सुनिलची आई सुमितची आत्या लागते, तर सुमितची आई ही सुनिलचीच्या आईची कोण ?

------ (1) आत्या
------ (2) बहीण
------ (3) नणंद
------ (4) वहिणी ( भावजय) ✓✓
====================
(३) सुप्रियाची काकू ही जयेशची मामी आहे, तर जयेश सुप्रियाचा कोण ?

------ (1) मामे भाऊ
------ (2) चुलते भाऊ
------ (3) आते भाऊ  ✓✓
------ (4) मावस भाऊ 
====================
(४) सानियाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावाचे नाव सुमित आहे, तर सुमितला बहिणी किती ?

------ (1) दोन
------ (2) एक
------ (3) चार
------ (4) तीन ✓✓
===================
(५) सुमितचे वडिल हे अनिकेतच्या आईचे दीर लागतात; तर अनिकेतच्या वडीलांची बहिण ही सुमितची कोण ?

------ (1) मामी
------ (2) आत्या ✓✓
------ (3) काकी
------ (4) आजी
=======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496

No comments:

Post a Comment