माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 20 September 2023

ऐका आणि सांगा. ( भाषिक उपक्रम )


✓ तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा सांगता येणे.
( शिक्षकांनी ३ ते ५ वाक्यांचा मजकूर ऐकवावा. ऐकलेला मजकूर विद्यार्थ्यांनी परत सांगावा.)

ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
चिंच आंबट असते.
कारले कडू असते.
आवळा तुरट असतो.
-------------------------

ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
साबुदाण्याची खिचडी करतात.
-------------------------

गायी गोठ्यात बांधतात.
पक्षी घरट्यात राहतात.
उंदीर बिळात राहतो.
वाघ गुहेत राहतो.
कोंबडी खुराड्यात राहते.
-------------------------

पोपट हा पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवा आहे. 
त्याची चोच लाल आहे.
तो विठू विठू बोलतो.
पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात.
-------------------------

आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो. 
आम्ही पाण्याने अंघोळ करतो.
आम्ही पाण्याने कपडे धुतो.
आम्ही पाणी शेतासाठी वापरतो.
पाणी हे जीवन आहे. 
-------------------------

शाळेसमोर बाग आहे.
फुलांवर फुलपाखरे उडतात.
बागेमध्ये फुले आहेत.
 मधमाशी मध गोळा करते. 
पोळ्यामध्ये साठवून ठेवते.
===================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment