(२) माझा मावशीचे बाबा माझे -- आजोबा
(३) माझ्या मामाचे बाबा माझे -- आजोबा
(४) माझ्या आईची आई माझी -- आजी
(५) माझ्या मावशीची आई माझी -- आजी
(६) माझ्या मामाची आई माझी -- आजी .
(७) माझ्या आईची सासू माझी -- आजी
(८) माझ्या आईचे सासरे माझे -- आजोबा
(९) माझ्या आईची नणंद माझी -- आत्या
(१०) माझ्या आईची वहिणी माझी -- मामी
(११) माझ्या आईची मुलगी माझी - बहीण
(१२) माझ्या मावशीची मुलगी माझी - बहीण
(१३) माझ्या आईचा मुलगा माझा -- भाऊ
(१४) माझ्या आईची बहिण माझी - मावशी
(१५) माझ्या मामाची बहिण माझी - मावशी
(१६) माझ्या मावशीची बहिण माझी - मावशी
(१७) माझ्या आईचा भाऊ माझा -- मामा
(१८) माझ्या मावशीचा भाऊ माझा - मामा
(१९) माझ्या मावशीचा मुलगा माझा - मावसभाऊ
(२०) माझ्या बहिणीचा मुलगा माझा - भाचा
(२१) माझ्या आईचे दीर माझा - काका
=========================
(२२) माझ्या वडिलांचे बाबा माझे -- आजोबा
(२३) माझ्या काकांचे वडिल माझे -- आजोबा
(२४) माझ्या आत्याचे बाबा माझे -- आजोबा
(२५) माझ्या बाबांची आई माझी -- आजी
(२६) माझ्या काकांची आई माझी - आजी
(२७) माझ्या आत्याची आई माझी - आजी
(२८) माझ्या काकांचा मुलगा माझा - चुलतभाऊ
(२९) माझ्या काकांची मुलगी माझी -- चुलतबहिण
(३०) माझ्या आत्याचा मुलगा माझा - आतेभाऊ
(३१) माझ्या आत्याची मुलगी माझी - आतेबहिण
(३२) माझ्या बाबांचा भाऊ माझा -- काका
(३३) माझ्या आत्याचा भाऊ माझा -- काका
(३४) माझ्या बाबांची बहिण माझी -- आत्या
========================
लेखन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ /७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment