माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 16 May 2024

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (मराठी भाषेचे व्याकरण)


१)अत्तराचे दिवे जाळणे :- भरपूर उधळपट्टी करणे.
२)अवदसा आठवणे :- वाईट बुद्धी होणे.
३)अंगवळणी पडणे :- नित्य सवयीचे होणे.
४)अंगाचा तिळपापड होणे :- अतिशय संताप येणे.
५)अंगीकार करणे :- स्वीकार करणे.
६)आ वासणे :- आश्चर्याने पाहणे.
७)आभाळ फाटणे :- चारी बाजूंनी संकटे येणे.
८)इतिश्री होणे :- शेवट होणे.
९)उखळ पांढरे होणे :- भरपूर संपत्ती मिळणे.
१०)ओनामा करणे :- प्रारंभ करणे.
११)अक्काबाईचा फेरा येणे :- दारिद्र्य येणे.
१२)अटकेपार झेंडा लावणे :- पराक्रमाची शर्थ गाजविणे.
१३)आहुती देणे :- अर्पण करणे.
१४)अंगाची लाही लाही होणे :- अतिशय संताप येणे.
१५)अर्धचंद्र देणे :- हकालपट्टी करणे.
१६)आवंढा गिळणे : दुःख आवरणे.
१७)ओलीस ठेवणे :- गहान ठेवणे.
१८)ऋण फेडणे :- उपकाराची परतफेड करणे.
१९)उदक सोडणे :- त्याग करणे.
२०)कचाट्यात सापडणे :- तावडीत सापडणे.
२१)कणीक तिंबणे :- सपाटून मार देणे.
२२)कानाचे डोळे करणे :- अतिशय लक्षपूर्वक ऐकणे.
२३)कानाशी लागणे :- हळू आवाजात सांगणे, कुजबुजणे.
२४)कंबक्ती काढणे :- खरडपट्टी काढणे.
२५)काळिमा फासणे :- कलंक लावणे.
२६)कुरापत काढणे :- खोडी काढणे.
२७)खसखस पिकणे :- मोठ्याने हसणे.
२८)खिजगणतीत धरणे :- जमेस धरणे.
२९)'ग'ची बाधा होणे :- अहंकार वाढणे, खूप गर्विष्ठ होणे.
३०)अठरा विश्वे दारिद्र्य असणे :- अतिशय दारिद्र्यात असणे.
३१)गंगेत घोडे न्हाणे :- योजलेले काम कसेबसे पार पडणे.
३२)ग्रहण सुटणे :- संकटातून मुक्त होणे.
३३)घर डोक्यावर घेणे :- घरात खूप आरडाओरडा करणे.
३४)घरावर तुळशीपत्र ठेवणे :- घरादाराचा त्याग करणे.
३५)आकाशपाताळ एक करणे :- नाहक गोंधळ घालणे.
३६)चहा करणे :- स्तुती करणे, वाहवा करणे.
३७)जीव मुठीत धरणे :- मन घट्ट करणे.
३८)जखमेवर मीठ चोळणे :- उणिवांकडे मुद्दाम निर्देश करणे.
३९)जीव की प्राण असणे :- प्राणांहून प्रिय असणे.
४०)जिवापाड जपणे :- मायेने खूप काळजी घेणे.
४१)आकाशाची कुऱ्हाड कोसळणे :- नैसर्गिक आपत्ती उद्भवणे.
४२)टक लावून पाहणे :- एकसारखे पाहणे.
४३)डोक्यात प्रकाश पडणे :- नेमके लक्षात येणे.
४४)तमा नसणे :- पर्वा नसणे.
४५)तोंडचे पाणी पळणे :- अतिशय घाबरणे.
४६)तोंडाला पाणी सुटणे :- खाण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होणे.
४७)तोंडात बोटे घालणे :- नवल करणे, आश्चर्यचकीत होणे.
४८)देशोधडीला लागणे :- अधोगती होणे.
४९)दाती तृण धरणे :- शरण येणे.
५०)दात कोरून पोट भरणे :- अतिशय काटकसर करणे.
५१)थुकी झेलणे :- भलती खुशामत करणे.
५२)धाबे दणाणणे :- भीतीने गर्भगळीत होणे.
५३)नाकी नऊ येणे :- बेजार होणे.
५४)नक्राश्रू ढाळणे :- खोटे दुःख प्रदर्शित करणे.
५५)पदरमोड करणे : शिलकीतील उरलेसुरले खर्च करणे.
५६)पाचावर धारण बसणे :- भीतीने बोबडी वळणे.
५७)कंठ दाटून येणे :- गहिवरून येणे.
५८)कानाडोळा करणे :- साफ दुर्लक्ष करणे.
५९)काळीज मोठे होणे :- खूप आनंद होणें.
६०)काकुळतीस येणे :- करुणा भाकणे, गयावया करणे.
६१)कृतकृत्य होणे :- धन्य होणे, समाधानी होणे.
६२)कौल देणे :- निर्णय देणे.
६३)खडे फोडणे :- दोष लावणे.
६४)खूणगाठ बांधणे :- पक्का निश्चय करणे.
६५)गळ घालणे :- आग्रह करणे.
६६)गाशा गुंडाळणे :- निघून जाणे.
६७)कागदी घोडे नाचविणे :- फक्त लिखानात शौर्य गाजविणे.
६८)गावी नसणे :- अजिबात माहीत नसणे.
६९)चकित होणे :- थक्क होणे.
७०)खोळंबा करणे :- अडथळा निर्माण करणे.
७१)चतुर्भुज होणे :- कैद होणे, लग्न करणे.
७२)चौदावे रत्न दाखविणे :- खूप मार देणे.
७३)जीवावर उदार होणे :- प्राणांची पर्वा न करणे.
७४)जीव लावणे :- लळा लावणे.
७५)जिवाचे रान करणे :- अतिशय कष्ट करणे.
७६)जिवात जीव येणे :- हायसे वाटणे.
७७)झोकून देणे :- मनापासून काम करणे.
७८)डाळ न शिजणे :- मात्रा न चालणे, निरुपाय होणे.
७९)ढोर मेहनत करणे :- खूप कष्ट करणे.
८०) तोंड सांभाळून बोलणे :- जपून बोलणें.
८१)तरणोपाय न उरणे :- अन्य चांगला उपाय न सुचणे.
८२)त्रेधा उडणे :- फार फजिती होणे.
८३)तिलांजली देणे :- त्याग करणे.
८४)तारे तोडणे :- असंबद्ध बोलणे.
८५)दोन हात करणे :- सामना करणे.
८६)देवाज्ञा होणे :- मरण पावणे.
८७)थंडा फराळ करणे :- उपाशी राहणे.
८८)धारातिर्थी पडणे :- युद्धात मरण येणे.
८९)धूळ चारणे :- पूर्ण पराभव करणे.
९०)नाकाने कांदे सोलणे :- खोटी ऐट मिरविणे.
९१)नाकी दम येणे :- दमछाक होणे.
९२)पदरात घालणे :- स्वाधीन करणे.
९३)पालथ्या घड्यावर पाणी घालणे :- व्यर्थ उपदेश करणे.
९४) पांग फेडणे :- उपकाराची परतफेड करणे.
९५) प्राण कंठाशी येणे :- अतिशय घाबरणे.
९६)पोबारा करणे :- पळून जाणे.
९७)पोटाला चिमटे घेणे :- अर्धपोटी, उपाशी राहणे.
९८)बडतर्फ करणे :- कामावरून कमी करणे.
९९)बांगडी फुटणे :- वैधव्य येणे.
१००)मनात मांडे खाणे :- मनोराज्य करणे, कल्पनाविश्वात रमणे.
१०१)मेटाकुटीला येणे :- त्रासून जाणे.
१०२)मेतकूट जमविणे :- दृढ मैत्री जमविणे.
१०३)राम नसणे :- अर्थ नसणे.
१०४)राजी असणे :- संमत असणे.
१०५)वाटेकडे डोळे लावून बसणे :- आतुरतेने वाट पाहणे.
१०६)वाऱ्यावर सोडणे :- दुर्लक्ष करणे.
१०७)विपर्यास करणे :- एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावणे.
१०८)वाटाण्याच्या अक्षता लावणे :- स्पष्ट शब्दात नकार देणे.
१०९)सळो की पळो करून सोडणे :- खूप त्रास देणे.
११०)सुंबाल्या करणे :- पळून जाणे.
१११)हतबल होणे :- असमर्थ होणे.
११२)हातघाईवर येणे :- अधीर होणे.
११३)अंगावर मूठभर मांस चढणे :- अल्पस्तुतीने हुरळून जाणे.
११४) अग्निदिव्य करणे आकाशाला :- सत्यता पटविण्यासाठी प्राणांतिक संकटातून जाणे.
११५)आकाशाला गवसणी गालणे :- अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करणे.
११६)काखा वर करणे :- जवळ काहीसुद्धा नसणे, जबाबदारी टाळणे.
११७)कानउघाडणी करणे :- चुकीबद्दल कडक शब्दात समज देणे.
११८)उष्ट्या हाताने कावळा न हाकणे :- स्वतःचे काहीही कधीच दुसऱ्याला न देणे
११९)उलटी अंबारी हाती येणे :- कंगाल होणे, भीकेला लागणे.
१२०)उंटावरून शेळ्या हाकणे :- स्वतः रिकामटेकडे राहून इतरांना उपदेश करणे.
१२१)गरीबी पाचवीला पुजलेली असणे :- जन्मापासून दारिद्र्यात वाढणे.
१२२)खाल्ल्या घरचे वासे मोजणे :- उपकारांची जाणीव न ठेवणे.
१२३)कानाला खडा लावणे :- एखादी चूक पुन्हा न करण्याचा निर्धार करणे.
१२४)ताटाखालचे मांजर होणे :- एखाद्याच्या पूर्णपणे अंकित होऊन राहणे.
१२५)दिङ्मूढ होणे :- एखाद्या प्रसंगी काय करावे ते न समजणे
१२६)लहान तोंडी मोठा घास घेणे :- स्वतःपेक्षा अधिक पात्र व्यक्तीस सल्ला देणे.
१२७)सुंठीवाचून खोकला जाणे :- कोणत्याही उपायाविना त्रासमुक्त होणे.
१२८)हातातोंडाशी गाठ पडणे :- मोजकेच खाण्यास मिळणे.
१२९)पांघरुण घालणे :- जाणुनबुजून दुर्लक्ष करणे.
१३०)पायाला भिंगरी बांधणे :- सतत फिरत राहणे.
१३१)पाणउतारा करणे :- अपमान करणे.
१३२)बस्तान बसविणे:- जम बसविणे.
१३३)बोळवण करणे :- पाठवणी करणे, रवानगी करणे.
१३४)मात्रा न चालणे :- उपाय न चालणे.
१३५)मुलाहिजा न बाळगणे :- पर्वा न करणे.
१३६)मुसंडी मारणे :- वेगाने पुढे घुसणे.
१३७)रसातळाला जाणे :- नाश होणे.
१३८) रक्ताचे पाणी करणे :- खूप कष्ट करणे.
१३९)राम म्हणणे :- मरण पावणे.
१४०)वाकडे पाऊल पडणे :- दुर्वर्तन घडणे.
१४१)वेशीवर टांगणे :- सर्वांसमोर जाहीर करणे.
१४२)विडा उचलणे :- प्रतिज्ञा करणे.
१४३)सव्यापसव्य करणे :- यातायात करणे.
१४४)षटकर्णी होणे :- गुप्त गोष्ट इतरांना समजणे.
१४५)सूतोवाच करणे :- प्रारंभ करणे.
१४६)हात ओले होणे :- फायदा होणे.
१४७)हातावर तुरी देणे : फसवून पळून जाणे.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment