(१) झाड (२) फूल (३) घर (४) गाव, (५) आंबा.
(१) झाड
झाड
हे झाड
हे झाड आहे.
हे झाड मोठे आहे.
हे झाड मोठे, डेरेदार आहे.
हे झाड मोठे, डेरेदार व उंच आहे.
हे झाड मोठे, डेरेदार, उंच व हिरवे आहे.
---------------------------------
(२) फूल
फूल
हे फूल
हे फूल आहे.
हे फूल लाल आहे.
हे फूल लाल, सुंदर आहे.
हे फूल लाल, सुंदर व टपोरे आहे.
हे फूल लाल, सुंदर, टपोरे व सुगंधी आहे.
---------------------------------------
(३) घर
घर
हे घर
हे घर आहे.
हे घर छान आहे.
हे घर छान, सुबक आहे.
हे घर छान, सुबक व टुमदार आहे.
हे घर छान, सुबक, टुमदार व कौलारू आहे.
-----------------------------------------
(४) गाव
गाव
हे गाव
हे गाव आहे.
हे गाव छोटे आहे.
हे गाव छोटे, स्वच्छ आहे.
हे गाव छोटे, स्वच्छ व नेटके आहे.
हे गाव छोटे, स्वच्छ, नेटके व निसर्गरम्य आहे.
------------------------------------------------
(५) आंबा
आंबा
हा आंबा
हा आंबा आहे.
हा आंबा मोठा आहे.
हा आंबा मोठा, पिवळसर आहे.
हा आंबा मोठा, पिवळसर व रसाळ आहे.
हा आंबा मोठा, पिवळसर, रसाळ व गोड आहे.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment