माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3271689

Monday, 1 July 2024

शब्द सोबती ( समानार्थी शब्द )


वसुधा भूमी धरणी 
रवि मित्र चिंतामणी 
प्रेम जिव्हाळा ममता 
लेक कन्या सुता 

आई माय माता 
 महिला स्त्री वनिता 
प्रजा लोक जनता 
बंधू भाऊ भ्राता 

स्नेही सोबती दोस्त 
भाऊबंद सगेसोयरे आप्त 
नंदन पुत्र सुत 
बाप पिता तात 

घर गृह सदन 
सुंदर सुरेख छान 
नेत्र डोळे नयन 
पुष्प फूल सुमन 

साथ संगत सोबत
पति भ्रर्ता कांत 
कल्याण कुशल हित 
मौज मजा गंमत

हुशार चतुर निपुण 
अलंकार दागिना भूषण 
नमन वंदन अभिवादन 
गौरव सन्मान अभिनंदन 
=======================
लेखन -- शंकर चौरे सर (साक्री) धुळे 
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment