आई म्हणाली तांबडा रंग कुंकवाचा
ताई म्हणाली नारिंगी रंग संत्र्याचा
बाई म्हणाली पिवळा रंग हळदीचा
काकू म्हणाली हिरवा रंग पोपटाचा
आजी म्हणाली निळा रंग आकाशाचा
वहिणी म्हणाली पांढरा रंग बगळ्याचा
दादा म्हणाला जांभळा रंग जांभूळाचा
बाबा म्हणाले सात रंगांचे कुटूंब झाले
आजोबा म्हणाले इंद्रधनुष्य तयार झाले
==========================
----- शंकर चौरे सर (पिंपळनेर ) धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment