माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 14 March 2025

सप्तरंगी बोल

गुरूजींनी विचारलं 
काळ रंग कशाकशाचा ?
मुलांनी सांगितलं 
केस, कोळसा आणि कावळ्याचा.

बाईंनी विचारलं 
पांढरा रंग कशाकशाचा ?
मुलांनी सांगितलं 
दूध, साखर आणि सश्याचा.

गुरूजींनी विचारलं 
पिवळा रंग कशाकशाचा ?
मुलांनी सांगितलं 
केळी, आंबा आणि हळदीचा.

बाईंनी विचारलं 
जांभळा रंग कशाकशाचा ?
मुलांनी सांगितलं 
कृष्णकमळ, जांभुळ आणि वांग्याचा.

गुरूजींनी विचारलं 
हिरवा रंग कशाकशाचा ?
मुलांनी सांगितलं 
मिरची, गवत आणि पोपटाचा.

बाईंनी विचारलं 
लाल रंग कशाकशाचा ?
मुलांनी सांगितलं 
कुंकू, जास्वंद आणि गुलाबाचा.

गुरूजींनी विचारलं 
निळा रंग कशाकशाचा ?
मुलांनी सांगितलं 
नीळ, शाई आणि मोराचा.
============================
----- शंकर मुराबाई सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment