माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 4 November 2026

किल्ले पाहायला जाऊ ( कविता )

किल्ले पाहायला जाऊ, इतिहास अनुभवू !

नाशिक जिल्ह्यात जाऊ,
साल्हेर-मुल्हेर पाहू,
महाराष्ट्राचा मान उंच, डोळ्यात साठवू.

धुळे जिल्ह्यात जाऊ,
थाळनेर-सोनगीर पाहू,
तापीच्या काठचा इतिहास, मनात रुजवू.

पुणे जिल्ह्यात जाऊ,
शिवनेरी-कोंढाणा पाहू,
शिवरायांचे बालपण, आम्ही आठवू.

अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊ,
हरिश्चंद्र-रतनगड पाहू,
सह्याद्रीच्या कड्यावर, मेघांसवे जाऊ.

छ. संभाजीनगर जिल्ह्यात जाऊ,
दौलताबाद-अंतुरगड पाहू,
अजिंक्य अभेद्यतेची, गाथा ऐकू.

सातारा जिल्ह्यात जाऊ,
प्रतापगड-अजिंक्यतारा पाहू,
शौर्याची गाथा सांगणारा, वारा अनुभवू.

कोल्हापूर जिल्ह्यात जाऊ,
पन्हाळा-विशाळगड पाहू,
सिद्धीचा वेढा फोडणारी, पाऊले मोजू.

रायगड जिल्ह्यात जाऊ,
रायगड आणि जंजिरा पाहू,
स्वराज्याची राजधानी, नतमस्तक होऊ.

पालघर जिल्ह्यात जाऊ,
वसई आणि अर्नाळा पाहू,
सागराच्या लाटांवरचा, पराक्रम पाहू.

रत्नागिरी जिल्ह्यात जाऊ,
सुवर्णदुर्ग-जयगड पाहू,
अरबी समुद्राचा पहारेकरी, डोळा भरून पाहू.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊ,
देवगड-सिंधुदुर्ग पाहू,
शिवरायांच्या दूरदृष्टीला, सलाम करू.

धाराशिव जिल्ह्यात जाऊ,
नळदुर्ग-परांडा पाहू,
बहमनी आदिलशाहीचा, इतिहास उलगडू.

लातूर जिल्ह्यात जाऊ,
औसा आणि उदगीर पाहू,
महाराष्ट्राची माती, कपाळी लावू.

चला चला मित्रांनो, किल्ले पाहायला जाऊ,
महाराष्ट्राचा इतिहास, घराघरात पोहोचवू !

---------------------
लेखन / कवी :-
शंकर मुराबाई सिताराम चौरे
जि. प. प्राथमिक शाळा - गरताड गावठाण, 
ता. साक्री, जि. धुळे 
9422736775 / 7721941496

किल्ले पाहायला जाऊ

नाशिक जिल्ह्यात जाऊ
साल्हेर किल्ला पाहू
मुल्हेर किल्ला पाहू

धुळे जिल्ह्यात जाऊ
थाळनेर किल्ला पाहू
सोनगिर किल्ला पाहू

पुणे जिल्ह्यात जाऊ
शिवनेरी किल्ला पाहू
कोंढाणा किल्ला पाहू

अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊ
हरिश्चंद्रगड किल्ला पाहू
रतनगड किल्ला पाहू

छ. संभाजीनगर जिल्ह्यात जाऊ
दौलताबाद किल्ला पाहू
अंतुरगड किल्ला पाहू

सातारा जिल्ह्यात जाऊ
प्रतापगड किल्ला पाहू
अजिंक्यतारा किल्ला पाहू

कोल्हापूर जिल्ह्यात जाऊ
पन्हाळा किल्ला पाहू
विशाळगड किल्ला पाहू

रायगड जिल्ह्यात जाऊ
रायगड जिल्हा पाहू
जंजिरा किल्ला पाहू

पालघर जिल्ह्यात जाऊ
वसई किल्ला पाहू
अर्नाळा किल्ला पाहू

रत्नागिरी जिल्ह्यात जाऊ
सुवर्णदुर्ग किल्ला पाहू
जयगड किल्ला पाहू

 सिंधुदुर्ग जिल्हा जाऊ
देवगड किल्ला पाहू
सिंधुदुर्ग किल्ला पाहू

धाराशिव जिल्ह्यात जाऊ
नळदुर्ग किल्ला पाहू
परांडा किल्ला पाहू

लातूर जिल्ह्यात  जाऊ
औसा किल्ला पाहू
उदगीर किल्ला पाहू
===================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्राथमिक शाळा गरताड गावठाण, केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  /  ७७२१९४१४९६