माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 12 April 2018

उपक्रम :- कागदाची काटकसर

        कागद वनस्पतींपासून तयार होतो.तेव्हा कागदाची काटकसर हा पर्यावरण रक्षणाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तुम्ही कागदाची काटकसर कशी कराल ?

■ वहीचे कोरे कागद टराटरा फाडू नका. 

■ असे करणे गरजेचे असेल तर समासामध्ये दुमडीजवळ एक सेंटिमीटर घडी पाडून  घडीवर कागद अलगद फाडा. असे केल्याने दुमडीपलीकडचा कागद वहीमध्ये सुरक्षित राहील. 

■ कागदाच्या दोन्ही बाजूंचा लेखनासाठी वापर करा. 

■ गणितामधील उदाहरणे कच्ची सोडवण्यासाठी पाटीपेन्सिलीचा वापर करा. पाटीपेन्सिल  वापरण्यात कोणताही कमीपणा नाही. 

■ वर्षअखेर वापरलेल्या वह्यांतील राहिलेले कोरे कागद अलगद काढून त्यांच्या वह्या बांधा. त्यांचा वापर किरकोळ लेखनासाठी करा. 

■ कोणत्याही प्रकारच्या कागदाचा निरुपयोगी  म्हणून नाश करू नका. वापरलेला कागद नवनिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो.
--------------------------------------------------
  संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                ता. साक्री जि. धुळे 

Wednesday, 11 April 2018

म.ज्योतिराव फुले तुझ्यामुळेच........


ज्योतिबा तुझ्यामुळेच मी शाळेत जाते.
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी वाचन करते 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी लेखन करते. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी भाषण करते. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी नेतृत्व करते. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी नाविन्याचा शोध घेते.
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी जागरूक झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी ज्ञानी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी स्वावलंबी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी जबाबदार झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी कष्टाळू झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी कार्यतत्पर झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी धीट झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी सुसंस्कृत झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी सुखी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी कौतुकास पात्र झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी अभिमानी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी प्रेरणादायी झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मी राष्ट्रपती झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच मला दूरदृष्टी मिळाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच माझी प्रगती झाली. 
ज्योतिबा तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला गती आली 

     लेखक:- शंकर चौरे(प्रा. शिक्षक)
                 जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
                  ता.साक्री जि.धुळे 
                  📞९४२२७३६७७५ 

Monday, 9 April 2018

भूकंपमापन महत्वपूर्ण माहिती

       
  भूकंप ही सदोदित घडणारी घटना आहे. 
त्यामुळे नुकसान आणि मनुष्यहानी मोठ्या 
प्रमाणावर होण्याची शक्यता असते. म्हणून 
भूकंपाची तीव्रता अजमावण्याचे प्रयत्न 
मानव नेहमीच करत आला आहे. भूकंप 
का होतात याची मानवाला पूर्वी माहिती 
नव्हती; पण भूकंपामुळे होणारे नुकसान तो 
सतत पाहत आला आहे. स्वाभाविकच झालेल्या 
हानीच्या आधारे तो भूकंपाची तीव्रता अजमावत 
आला आहे. त्याचबरोबर भूकंपाची तीव्रता 
अचूक मोजण्यासाठी तो सतत प्रयत्नशील 
राहिला आहे. 
 ● भूकंपाच्या हाद-याची नोंद करणे, हे 
   भूकंपमापीचे कार्य ( रिश्टर स्केल ) --
         भूकंप होताना जमिनीखालून मोकळ्या 
होणाऱ्या ऊर्जेमुळे जमिनीला हादरे बसून 
कमी - अधिक नुकसान होते; म्हणून भूकंपाची 
तीव्रता मोजण्यासाठी मोकळ्या झालेल्या 
ऊर्जेचे मोजमाप करणे अधिक शास्त्रीय ठरते. 
यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट 
ऑफ टेक्नॉलॉजी येथील भूवैज्ञानिक चार्ल्स 
एफ. रिश्टर यांनी १९३५ साली नवा मापक्रम 
तयार केला. हे ते रिश्टर स्केल. 

■ भूकंपाच्या तीव्रतेचा मापक्रम --
(१) भूकंपलेखी :--
    रिश्टर महत्ता  ३.५ केवळ भूकंपमापकात नोंद. 

(२) किंचित  :--
    रिश्टर महत्ता ४.२ स्वस्थ बसलेल्या, विशेषत:
   वरच्या मजल्यावरील लोकांनी जाणवतो. 

(३) मध्यम  :--
    रिश्टर महत्ता ४. ८ चालणाऱ्या लोकांना 
जाणवतो, उभी वाहने डोलतात. 

(४)काहीसा जोरदार :--
     रिश्टर महत्ता ४.९ सर्व लोकांना जाणवतो, झोपलेले जागे होतात, टांगलेल्या घंटा वाजतात. 

(५) फार जोरदार  :--
     रिश्टर महत्ता ५.५ ते ६.१ सर्वत्र भयग्रस्त 
वातावरण,भिंतीना तडे जातात,गिलावा पडतो.  

(६) विनाशक :--
    रिश्टर महत्ता ६.९ बरीच घरे पडतात. 
जमिनीला भेगा पडतात. पाण्याचे नळ तुटतात. 

(७) अनर्थकारी  :--
    रिश्टर महत्ता ७.३ भूपृष्ठाला भेगा पडतात,
अनेक इमारती नष्ट होतात, रूळमार्ग वेडेवाकडे  
होतात, जास्त उताराकडे कडे कोसळतात. 

(८) सर्वानर्थकारी :--
   रिश्टर महत्ता ७.४ ते ८.१ बहुतेक सर्व इमारती
भुईसपाट होतात. पूल कोसळतात. रूळमार्ग,
पाण्याचे नळ,  दूरध्वनीतारा या सर्वांचे कार्य 
पूर्णत: विस्कळीत होते. 

(९) पराकोटीचा संहारक  :--
     रिश्टर महत्ता ८.५ ते ८.९ भूपृष्ठावरील सर्व     
 बांधकामांचा विनाश,वस्तू हवेत फेकल्या 
जातात. जमीन तरंगरूपात वर - खाली होते. 
----------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक )
              जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
               ता. साक्री जि. धुळे 
                ९४२२७३६७७५