माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 9 April 2018

भूकंपमापन महत्वपूर्ण माहिती

       
  भूकंप ही सदोदित घडणारी घटना आहे. 
त्यामुळे नुकसान आणि मनुष्यहानी मोठ्या 
प्रमाणावर होण्याची शक्यता असते. म्हणून 
भूकंपाची तीव्रता अजमावण्याचे प्रयत्न 
मानव नेहमीच करत आला आहे. भूकंप 
का होतात याची मानवाला पूर्वी माहिती 
नव्हती; पण भूकंपामुळे होणारे नुकसान तो 
सतत पाहत आला आहे. स्वाभाविकच झालेल्या 
हानीच्या आधारे तो भूकंपाची तीव्रता अजमावत 
आला आहे. त्याचबरोबर भूकंपाची तीव्रता 
अचूक मोजण्यासाठी तो सतत प्रयत्नशील 
राहिला आहे. 
 ● भूकंपाच्या हाद-याची नोंद करणे, हे 
   भूकंपमापीचे कार्य ( रिश्टर स्केल ) --
         भूकंप होताना जमिनीखालून मोकळ्या 
होणाऱ्या ऊर्जेमुळे जमिनीला हादरे बसून 
कमी - अधिक नुकसान होते; म्हणून भूकंपाची 
तीव्रता मोजण्यासाठी मोकळ्या झालेल्या 
ऊर्जेचे मोजमाप करणे अधिक शास्त्रीय ठरते. 
यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट 
ऑफ टेक्नॉलॉजी येथील भूवैज्ञानिक चार्ल्स 
एफ. रिश्टर यांनी १९३५ साली नवा मापक्रम 
तयार केला. हे ते रिश्टर स्केल. 

■ भूकंपाच्या तीव्रतेचा मापक्रम --
(१) भूकंपलेखी :--
    रिश्टर महत्ता  ३.५ केवळ भूकंपमापकात नोंद. 

(२) किंचित  :--
    रिश्टर महत्ता ४.२ स्वस्थ बसलेल्या, विशेषत:
   वरच्या मजल्यावरील लोकांनी जाणवतो. 

(३) मध्यम  :--
    रिश्टर महत्ता ४. ८ चालणाऱ्या लोकांना 
जाणवतो, उभी वाहने डोलतात. 

(४)काहीसा जोरदार :--
     रिश्टर महत्ता ४.९ सर्व लोकांना जाणवतो, झोपलेले जागे होतात, टांगलेल्या घंटा वाजतात. 

(५) फार जोरदार  :--
     रिश्टर महत्ता ५.५ ते ६.१ सर्वत्र भयग्रस्त 
वातावरण,भिंतीना तडे जातात,गिलावा पडतो.  

(६) विनाशक :--
    रिश्टर महत्ता ६.९ बरीच घरे पडतात. 
जमिनीला भेगा पडतात. पाण्याचे नळ तुटतात. 

(७) अनर्थकारी  :--
    रिश्टर महत्ता ७.३ भूपृष्ठाला भेगा पडतात,
अनेक इमारती नष्ट होतात, रूळमार्ग वेडेवाकडे  
होतात, जास्त उताराकडे कडे कोसळतात. 

(८) सर्वानर्थकारी :--
   रिश्टर महत्ता ७.४ ते ८.१ बहुतेक सर्व इमारती
भुईसपाट होतात. पूल कोसळतात. रूळमार्ग,
पाण्याचे नळ,  दूरध्वनीतारा या सर्वांचे कार्य 
पूर्णत: विस्कळीत होते. 

(९) पराकोटीचा संहारक  :--
     रिश्टर महत्ता ८.५ ते ८.९ भूपृष्ठावरील सर्व     
 बांधकामांचा विनाश,वस्तू हवेत फेकल्या 
जातात. जमीन तरंगरूपात वर - खाली होते. 
----------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक )
              जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर 
               ता. साक्री जि. धुळे 
                ९४२२७३६७७५

          
            

No comments:

Post a Comment