माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 9 January 2021

म्हणजे काय ?


अंजली म्हणजे ओंजळ
निर्मला म्हणजे निर्मळ
निरज म्हणजे कमळ
आकाश म्हणजे आभाळ
मोहिनी म्हणजे भुरळ
उषा म्हणजे सकाळ

अस्मिता म्हणजे अभिमान
विद्या म्हणजे ज्ञान
नुतन म्हणजे नवीन
अनिल म्हणजे पवन
आकाश म्हणजे गगन
भूमी म्हणजे जमीन

नयन म्हणजे लोचन
जागृती म्हणजे भान
संतोष म्हणजे समाधान
चंचल म्हणजे बुद्धिमान
नमन म्हणजे वंदन
विपिन म्हणजे वन

गौरव म्हणजे सन्मान
सपना म्हणजे स्वप्न
रंजना म्हणजे प्रसन्न
छोटी म्हणजे लहान
संकेत म्हणजे खूण
सारंग म्हणजे हरिण

संग्राम म्हणजे समर
पवन म्हणजे समीर
शीतल म्हणजे गार
रूपेश म्हणजे सुंदर
मयूर म्हणजे मोर
मिलिंद म्हणजे भ्रमर

लता म्हणजे वेल
कुसुम म्हणजे फूल
विपिन म्हणजे जंगल
जनक म्हणजे वडील
कल्याण म्हणजे कुशल
लतिका म्हणजे वेल
================================
लेखक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday, 6 January 2021

समूहदर्शक, पिल्लूदर्शक, घरदर्शक , ध्वनीदर्शक शब्द प्रश्नावली.


(१) ' गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरू

(२) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई

(३) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे

(४) ' पाडस ' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर -- हरणाच्या

(५) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा

(६) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे

(७) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा

(८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ

(९) मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- वारूळ

(१०) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ

(११) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे

(१२) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू

(१३) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा

(१४) कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- कुईकुई ( कोल्हेकुई )

(१५) हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- चित्कार

(१६) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू

(१७) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला / पागा

(१८) पायी चाललेल्या वारक-यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- दिंडी

(१९) माणसाच्या पिलास काय म्हणतात ?
उत्तर -- लेकरू / बाळ

(२०) पोपट पिंज-याशिवाय आणखी कुठे राहतो ?
उत्तर -- ढोलीत
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

सामान्यज्ञान प्रश्नावली

   
(१) ' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा
---------------------------------------------------
(२) ' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना
---------------------------------------------------
(३) ' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना
---------------------------------------------------
(४) ' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठें आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
---------------------------------------------------
(५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर
---------------------------------------------------
(६) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.
---------------------------------------------------
(७) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे
---------------------------------------------------
(८) ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा
---------------------------------------------------
(९) पालघर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र
कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी
---------------------------------------------------
(१०) ' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम
---------------------------------------------------
(११) अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
(१२) महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर
===================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.. शिक्षक)
जि. प..प्रा..शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५