माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 2 April 2021

प्रत्यय जोडून तयार होणारे शब्द .


● मूळ शब्दानंतर जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो.


त्याला प्रत्यय म्हणतात; म्हणून ' भर , दार , वर, करी, वान ' हे प्रत्यय आहेत.


● प्रत्यय जोडून शब्द तयार करणे.

(१) ' भर ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- मिनिटभर तासभर दिवसभर महिनाभर
वर्षभर सालभर वीतभर ओंजळभर 
डबाभर टोपलीभर वावभर गावभर
रात्रभर जन्मभर
----------------------------------------------
(२) ' दार ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- दुकानदार जमीनदार फौजदार साथीदार
धारदार दिलदार किल्लेदार शिलेदार
खबरदार शानदार रखवालदार डौलदार
ऐटदार रूबाबदार टोकदार
-------------------------------------------------
(३) ' वर ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- झाडावर हातावर टेबलावर खुर्चीवर
घरावर दारावर टेकडीवर फांदीवर
भिंतीवर पाण्यावर होडीवर पंख्यावर
घड्याळावर मंडपावर जमीनीवर डोंगरावर
-------------------------------------------------
(४) ' करी ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- शेतकरी कष्टकरी देणेकरी पहारेकरी
वारकरी मानकरी कामकरी गावकरी
-------------------------------------------------
(५) ' वान ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- बलवान धनवान रूपवान बागवान
गाडीवान गुणवान शीलवान धैर्यवान
भगवान प्रतिभावान प्रज्ञावान
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 1 April 2021

भारतातील प्रमुख स्थळे / शहरे व त्यांची प्रसिद्धी.


(१) वाघा 
--- पंजाब, जमिनीवरील मार्गाने भारत - पाकिस्तान सरहद्द
ओलांडण्याचे ठिकाण आहे. 
----------------------------------
(२) लेह
--- जम्मू आणि काश्मिर, जगातील एक अति उंचावरील निवासी शहर आहे. 
----------------------------------
(३) विजापूर 
--- कर्नाटक, विश्वविख्यात गोल घुमट व बाजूचे चार सातमजली मिनार आहे. 
----------------------------------------------------
(४) पानिपत 
--- हरियाणा , इतिहास प्रसिद्ध लढ्यांचे स्थान, पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा आहे. 
----------------------------------------------------
(५) फत्तेपूर सिक्री
--- उत्तर प्रदेश, आग्रा जवळ अकबराने वसवलेले राजधानीचे नगर, जोधाबाईंबाचा राजवाडा, बिरबलाचा
राजवाडा, बुलंद दरवाजा, पंचमहल इ. आहेत.
----------------------------------------------------
(६) धरमशाला 
--- हिमाचल प्रदेश, तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचे 
वास्तव्यस्थान, थंड हवेचे ठिकाण आहे. 
----------------------------------------------------
(७) पोकरण / पोखरण 
--- राजस्थान, भारतातीय अणु चाचण्याचे केंद्र, १८ मे 
१९७४ रोजी भारताने येथे पहिला अणुस्फोट घडवून 
आणला. त्यानंतर २४ वर्षांनी ११ मे १९९८ रोजी 
तीन व १३ मे १९९८ रोजी दोन अशा पाच अणुचाचण्या 
झाल्या आहे. 
----------------------------------------------------
(८) शांतिनिकेतन 
--- पश्चिम बंगाल, रविंद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेले विद्याकला - संस्कृती केंद्र व विश्व भारती विद्यापीठ आहे. 
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड 
ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५

नवी दिशा, नवे उपक्रम ( माझी विचारधारा शुभेच्छा... )


नवी दिशा, नवे उपक्रम वर्धापनदिनी उधळू रंग
सप्तरंगी उपक्रम, ज्ञानसागरात चार वर्षे होतो दंग

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला ताई - भाऊंची जोड
चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाने समूह झाला गोड

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाचे गुणगाऊ मनोभाव
देवराव चव्हाण सर सर्वांना मार्गदर्शन करतात प्रेमभाव

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला उच्च परंपरा लाभली
सप्तरंगी उपक्रम, कलाकृतीच्या जगात गुरूजनं रमली

नवी दिशा, नवे उपक्रम समूहात ज्ञानाची वाटते गमंत
भाषा, गणित, विज्ञान आणि सामान्यज्ञानाची संगत

नवी दिशा, नवे उपक्रम समूहात चालत नाही हेवे दावे
चव्हाण सरांचे विचार हेच की सारे उपक्रमशील व्हावे

देवराव चव्हाण सरांच्या मनात सोज्वळतेचा दिवा
नवी दिशा, नवे उपक्रम परिवार रूपाने लाभला ठेवा.

नवी दिशा, नवे उपक्रम घराला ज्ञानरूपी दर्पण.
आपण सर्व उपक्रमशील शिक्षकांनी ज्ञान केलं अर्पण.

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला ज्ञानसागराची किनार
आपण सर्व देतात एकमेकांना सुख दुःखात आधार

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला आज आली शोभा
देवराव चव्हाण सरांच्या रूपाने मार्गदर्शक उभा.

नवी दिशा, नवे उपक्रम समूह ज्ञानरूपी सोनेरी कळस
या परिवारात राहयचं तर, चालत नाही आळस.

नवी दिशा, नवे उपक्रम समूह अप्रतिम सुंदर
कर्तृत्ववान भाऊ - ताईंची येथे होते कदर.

नवी दिशा, नवे उपक्रम समूहात गुरूजनं कुशल
उपक्रम, सामान्यज्ञान व कोडी देतात स्पेशल.

नवी दिशा, नवे उपक्रम समूह आहे पवित्र
या समूहाचे उपक्रम सादर होतात सर्वत्र

इंग्रजी भाषेत चंद्रला म्हणतात मून
नवी दिशा, नवे उपक्रम समूहात सप्तरंगी गुण.
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता साक्री जि धुळे
९४२२७३६७७५