माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 2 April 2021

प्रत्यय जोडून तयार होणारे शब्द .


● मूळ शब्दानंतर जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो.


त्याला प्रत्यय म्हणतात; म्हणून ' भर , दार , वर, करी, वान ' हे प्रत्यय आहेत.


● प्रत्यय जोडून शब्द तयार करणे.

(१) ' भर ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- मिनिटभर तासभर दिवसभर महिनाभर
वर्षभर सालभर वीतभर ओंजळभर 
डबाभर टोपलीभर वावभर गावभर
रात्रभर जन्मभर
----------------------------------------------
(२) ' दार ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- दुकानदार जमीनदार फौजदार साथीदार
धारदार दिलदार किल्लेदार शिलेदार
खबरदार शानदार रखवालदार डौलदार
ऐटदार रूबाबदार टोकदार
-------------------------------------------------
(३) ' वर ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- झाडावर हातावर टेबलावर खुर्चीवर
घरावर दारावर टेकडीवर फांदीवर
भिंतीवर पाण्यावर होडीवर पंख्यावर
घड्याळावर मंडपावर जमीनीवर डोंगरावर
-------------------------------------------------
(४) ' करी ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- शेतकरी कष्टकरी देणेकरी पहारेकरी
वारकरी मानकरी कामकरी गावकरी
-------------------------------------------------
(५) ' वान ' प्रत्यय जोडून शब्द तयार करा.

--- बलवान धनवान रूपवान बागवान
गाडीवान गुणवान शीलवान धैर्यवान
भगवान प्रतिभावान प्रज्ञावान
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment