माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3280092

Thursday, 1 April 2021

नवी दिशा, नवे उपक्रम ( माझी विचारधारा शुभेच्छा... )


नवी दिशा, नवे उपक्रम वर्धापनदिनी उधळू रंग
सप्तरंगी उपक्रम, ज्ञानसागरात चार वर्षे होतो दंग

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला ताई - भाऊंची जोड
चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाने समूह झाला गोड

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाचे गुणगाऊ मनोभाव
देवराव चव्हाण सर सर्वांना मार्गदर्शन करतात प्रेमभाव

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला उच्च परंपरा लाभली
सप्तरंगी उपक्रम, कलाकृतीच्या जगात गुरूजनं रमली

नवी दिशा, नवे उपक्रम समूहात ज्ञानाची वाटते गमंत
भाषा, गणित, विज्ञान आणि सामान्यज्ञानाची संगत

नवी दिशा, नवे उपक्रम समूहात चालत नाही हेवे दावे
चव्हाण सरांचे विचार हेच की सारे उपक्रमशील व्हावे

देवराव चव्हाण सरांच्या मनात सोज्वळतेचा दिवा
नवी दिशा, नवे उपक्रम परिवार रूपाने लाभला ठेवा.

नवी दिशा, नवे उपक्रम घराला ज्ञानरूपी दर्पण.
आपण सर्व उपक्रमशील शिक्षकांनी ज्ञान केलं अर्पण.

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला ज्ञानसागराची किनार
आपण सर्व देतात एकमेकांना सुख दुःखात आधार

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाला आज आली शोभा
देवराव चव्हाण सरांच्या रूपाने मार्गदर्शक उभा.

नवी दिशा, नवे उपक्रम समूह ज्ञानरूपी सोनेरी कळस
या परिवारात राहयचं तर, चालत नाही आळस.

नवी दिशा, नवे उपक्रम समूह अप्रतिम सुंदर
कर्तृत्ववान भाऊ - ताईंची येथे होते कदर.

नवी दिशा, नवे उपक्रम समूहात गुरूजनं कुशल
उपक्रम, सामान्यज्ञान व कोडी देतात स्पेशल.

नवी दिशा, नवे उपक्रम समूह आहे पवित्र
या समूहाचे उपक्रम सादर होतात सर्वत्र

इंग्रजी भाषेत चंद्रला म्हणतात मून
नवी दिशा, नवे उपक्रम समूहात सप्तरंगी गुण.
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment