माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 30 September 2018

स्वच्छता मोहीम - घोषवाक्ये


(१) स्वच्छता पाळा ,
       रोगराई टाळा.

(२) जिथे स्वच्छता असे,
      तिथे आरोग्य वसे.

(३) कचरा टाकणार नाही रस्त्यावर,
     हा नियम बिंबवू मनावर.

(४) कचरा करूनी कमी,
     आरोग्याची मिळेल हमी.

(५) गाडगेबाबांचा एकच मंत्र,
      स्वच्छतेचे जाणा तंत्र..

(६) परिसराची करू सफाई,
      आरोग्याची होईल कमाई.

(७) सांडपाणी नको रस्त्यावर,
     डासांच्या पैंदाशीला घाला आवर.
    
(८) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,
      हे तर दूषित पाण्याचे प्रहार.

(९) उघड्यावर शौचास बसु नका,
      रोगांना आमंत्रण देऊ नका.

(१०) परिसर स्वच्छ ठेवाल,
        तर निरोगी व्हाल.

(११) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
        आरोग्य आपले निरोगी बनवू.

(१२) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,
       डासांची अंडी पळवुन लावा.

(१३) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
       नाहीतर होईल आरोग्याची हानी.

(१४) नका बसु उघड्यावर संडासाला ,
        संधी मिळेल रोगाराई पसरण्याला.

(१५) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
       गावात येईल आरोग्याची पहाट.

(१६) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे ,
        दूषित करू नका तुमच्या हाताने.

(१७) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,
        ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.

(१८) ज्याचे घरी सदैव स्वच्छता,
       नांदेल तेथे आरोग्य सुबता.

(१९) रंग भगवा त्यागाचा,
        मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.

(२०) पाणी शुद्धिकरण नियमित करू,
        सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.

(२१) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,
        सर्व रोगराईना दूर पळवू .

(२२) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
        देईल सामाजिक आरोग्याला गती.

(२३) वैयक्तिक स्वच्छतेची महती,
        रोगापासुन मिळेल मुक्ति.

(२४) नखे कापा बोटाची ,
        नाही होणार व्याधि पोटाची.

(२५) असेल दृष्टी ,
        तर दिसेल स्वच्छ सृष्टि.

(२६) संडास बांधा घरोघरी ,
        आरोग्य नांदेल त्याच्या दारी.

(२७) सांडपाण्याला आळा ,
        रोगाराई टाळा.

(२८) स्वच्छ सुंदर परिसर ,
        जीवन निरोगी निरंतर.     

(२९) स्वच्छ सुंदर परिसरातुच ,
        सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.

(३०) गावकरी मिळुन एक काम करू,
        शौचालयाचा वापर करू.

(३१) शौचालय असेल जेथे ,
        खरी प्रतिष्ठा येईल तेथे.

(३२) आधी केले मग सांगितले ,
        आधी आपल्या घरी शौचालय बांधले.

(३३) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,
        शोचखड्याचा करुया वापर.

(३४) कचरा कुंडीचा वापर करू ,
        सुंदर परिसर निर्माण करू

(३५) केरकचरा मुक्त गाव,
        सर्वत्र होईल नाव.

(३६) थोडी तर ठेवा जाण,
        सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.

(३७) स्वच्छतेचे ठेवा ध्यान.
        स्वच्छतेनेच देश बनेल महान.

(३८)  स्वच्छता हे महा अभियान,
         स्वच्छतेसाठी द्या आपला योगदान.

(३९) स्वच्छतेचे करा पालन
         स्वच्छ करा घराचे अंगण.

(४०) स्वच्छ सुंदर परिसरातुनच,
        सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.

(४१) स्वच्छ शाळा करा हातांनी,
        सुंदर गाणी गाऊ मुखांनी.

(४२) स्वच्छ सुंदर परिसर,
        जीवन निरोगी निरंतर.

(४३) संडास बांधा घरोघरी,
        आरोग्य नांदेल त्याच्या दारी.

(४४) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
        देईल सामाजिक आरोग्याला गती.

=================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (धुळे)
              ¤ ९४२२७३६७७५

Saturday, 29 September 2018

वाद्यांविषयी थोडक्यात माहिती

(१) सनई :-

सनई हे वायूवाद्य आहे. मंगल प्रसंगी हे वाद्य
वाजवले जाते. सनईचे सूर गोड असतात.
------------------------------------------------ 

(२) डमरू :-

डमरू हे एक तालवाद्य आहे. ते डुम डुम
असा आवाज करते. माकडाच्या खेळात
मदारी या वाद्याचा उपयोग करतो.
--------------------------------------------------

(३)  तुतारी :-

तुतारी हे एक रणवाद्य आहे. याचा आवाज
कर्कश असतो. पूर्वी युद्धाच्या प्रारंभी हे वाद्य
वाजवले जायचे. युद्धात राजाचा विजय
झाल्यावर सनई - चौघडा यांच्यासोबत हे
 विजयी वाद्य वाजवण्यात यायचे.
--------------------------------------------------

(४) तबला - डग्गा  :-

तबला - डग्गा हे कातडी वाद्य आहे. शास्त्रीय
गायनात पेटीच्या साथीला ठेका देण्यासाठी
वाजवले जाते.
--------------------------------------------------

(५) ढोलकी :-

ढोलकी तमाशाच्या फडात लावणी व पोवाडा
या गायनप्रकारात ढोलकीची साथ आवश्यक
असते. ढोलकीच्या तालावर नृत्य केले जाते.
--------------------------------------------------

(६)  डफ किंवा हलगी :-

डफ/हलगी हे एक कातडी वाद्य आहे. पोवाडा
गाताना शाहीर हे स्वतः हाताने वाजवतात.
--------------------------------------------------

(७) खंजिरी / डफली  :-

खंजिरी/डफली हे कातडी वाद्य शाहीर गाताना
वाजवतात. याच्या कडेला बारीक झांजा असतात.
--------------------------------------------------

(८) ताशा :-

ताशा हे कोकणातील कातडी वाद्य दोन
काठ्यांनी वाजवतात. पूर्वीच्या काळी लग्नाच्या
वरातीत हे वाजवत असत.
--------------------------------------------------

(९) वीणा :-

वीणा हे एक तंतूवाद्य आहे. गायनाच्या साथीला
सूर कायम गुंजत राहण्यासाठी शास्त्रीय गायक
वापरतात.
--------------------------------------------------

(१०) तुणतुणे :-

तुणतुणे हे लावणी, पोवाडा गाताना झिलकरी
हे तंतूवाद्य साथीला घेतात.
--------------------------------------------------

(११)  बासरी :-

बासरी हे बांबूचे बनलेले वायूवाद्य आहे.
हे ओठांच्या फुंकरीने वाजवले जाते. याचा
स्वर मधुर असते.
--------------------------------------------------

(१२) झांज :-

झांज हे एक धातू वाद्य आहे. लेझीम विशेषतः
खेळताना हे वाजवले जाते. 
 
=================================

संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शि.)
                पिंपळनेर - साक्री ( धुळे )
                 ¤ ९४२२७३६७७५ ¤

Thursday, 27 September 2018

शब्द ऐकूया / वाचूया , शब्द लिहूया .

                  उपक्रम
  
● खालील शब्द ऐकून  ( वाचून )  लिहा.

(१) द्विरूक्तीपूर्ण शब्द :--
    (१) कटकट चटचट   पटपट  वटवट 
    (२) भरभर   गरगर   थरथर  घरघर
    (३) सरसर   वरवर   भरभर   तरतर
    (४) टकटक   भकभक  धकधक
    (५) रिपरिप   झिमझिम   पिरपिर 
________________________________
(२) ध्वनिदर्शक  शब्द :--
    (१) कडकडाट खडखडाट   गडगडाट 
    (२) ठणठणाट  सडसडाट  फडफडाट
    (३) धडधडाट  ठणठणाट  भुणभुणाट
______________________________
(३) जोडशब्द :--
    (१)  घरदार  नफातोटा   बापलेक
    (२) काळवेळ   केरकचरा   चढउतार
    (३) चारापाणी   ताटवाटी   तिखटमीठ
    (४) धागादोरा  भाजीपाला   शेतीवाडी
________________________________
(४) जोडाक्षरी शब्द :--
  (१) त्याला  त्याच्या तुम्ही  आम्ही
  (२) माझ्या  तुझ्या  म्हणाला  म्हणाली
  (३)  तेव्हा  जेव्हा  केव्हा होत्या
  (४) द-या  खऱ्या  पु-या  कै-या
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                   पिंपळनेर - साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५