माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 15 January 2017

बैलाची तक्रार

लेखक /कवि :- शंकर चौरे   (पिंपळनेर) धुळे

               🐂 बैलाची तक्रार 🐄

लोकहो,  माझ्याकडे करू नका कानाडोळा
आमच्या श्रमाविषयी कृतज्ञता तुम्ही पाळा
याची असू द्या तुम्हा कळकळा
आला ऋतू उन्हाळा कामाचा ताण वेगळा
बैलोबा म्हणून हिणवणे टाळा
माझ्या दुःखावर थोडे भाळा
आम्ही जर झालो गोळा
तर निघेल तुमचा दिवाळा
आला ऋतू पावसाळा
मला दमवून करता चाळा
सांजसकाळी माझ्यावर डोळा
उरलासुरला असतो अन्न शिळा
करता तुम्ही एकत्र गोळा
ठेवता माझ्यासमोर सगळा
खाऊन खाऊन येतो कंटाळा
माझ्या जीवनाचा करता वाटोळा
अपमानाची वागणूक देणे टाळा   
आला सण पोळा
लावता पुरणपोळीचा लळा
इतर दिवस वाळके गवत चघळा
एक दिवस तरी व्यवस्थित ओवाळा
त्याचा सुध्दा येतो तुम्हाला कंटाळा
लावता शिंगाना रंग लाल,पिवळा
दोन बोटे कुंकवाचा टिळा
असा करता तुम्ही आमचा सोहळा
काम करतो तेव्हा गळ्यात घालता माळा
म्हातारे झालो की करता चाळा
आमच्या श्रमाचं मोल होतं खुळा
वेळ संपली की मानेवर सुळा
आम्ही तुमचा मक्ता घेतला का सगळा
तुम्हाला पेन्शन, फंड निराळा
पण आम्हाला काही नको वेगळा
आमच्या बळावर मोठा गळा
आम्हाला भुकेने, तहानेने नका छळा    
स्वतःला पशूपेक्षा श्रेष्ठ नका उधळा
माझी तुम्हां विनंती आहे ,नादान बाळा
म्हातारपणी मला सुख देणे नियम पाळा

              लेखक /कवि:--
                      शंकर चौरे
                      पिंपळनेर
                      ता. साक्री जि.धुळे
                        ९४२२७३६७७५
 
        
                

No comments:

Post a Comment