🔹 कशात काय ? ( बडबडगीत )
लेखक/कवी :-शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
राजवाड्यात राणी
विहिरीत पाणी
कपाटात साडी
अंगणात गाडी
टोपलीत भाकर
बरणीत साखर
कढईत पाक
मडक्यात ताक
ताटलीत गूळ
जमिनीत मूळ
किटलीत चहा
उजळणीत दहा
वाटीत दही
दप्तरात वही
दिव्यात तेल
बागेत वेल
घरात मूसळ
ताटात उसळ
डब्यात पीठ
बशीत मीठ
थाळीत भात
समईत वात
जंगलात ससा
पाण्यात मासा
लेखक/कवी :- शंकर चौरे (प्रा.शि.)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment