विषय :- विज्ञान(परिसर अभ्यास)
☺ उपक्रम ☺
🔹ओळखा पाहू मी कोण ?🔹
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
(१) झाडांना मी आधार देतो.
क्षार व पाणी शोषून घेतो.
त्यांना खोडाकडे मी पाठवतो.
ओळखा पाहू मी कोण ?
(२) वनस्पतींना देतो आकार
पानाफुलांना देतो आधार
सर्वांना पोहचवितो पाणी व क्षार
ओळखा पाहू मी कोण ?
(३) रंग माझा हिरवा हिरवा
माझ्यात आहेत हिरवे कण
करतो तयार वनस्पतींचे अन्न
ओळखा पाहू मी कोण ?
(४) त-हेत-हेचे रंग मजेचे
वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे
म्हणून देवालाही आवडतो आम्ही
फळांना जन्म देतो आम्ही
ओळखा पाहू आम्ही कोण ?
उत्तरे :-(१)मूळ, (२) खोड,(३)पान,(४)फूल
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिपळनेर ता.साक्री जिल्हा धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment