माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 30 December 2017

तोंडी बेरीज  (सराव )


● तोंडी बेरीज अचूक करण्याची सवय
   लावण्यासाठी उपयुक्त .

१० + १० = २०  ■  १०० + १०० = २००
२० + १० = ३०  ■ २०० + १०० = ३००
३० + १० = ४०  ■ ३०० +१०० = ४००
२० + २० = ४०  ■ २०० + २०० = ४००
४० + १० = ५०  ■  ४०० + १०० = ५००
३०+ २० = ५०   ■ ३०० + २०० = ५००
५० + १० = ६०  ■ ५०० + १०० = ६००
४० + २० = ६०  ■ ४०० + २०० = ६००
३० + ३० = ६०  ■ ३०० + ३०० = ६००
६० + १० = ७०  ■ ६०० + १०० = ७००
५० + २० = ७०  ■ ५०० + २०० = ७००
४० + ३० = ७०  ■ ४०० + ३०० = ७००
७० + १० = ८०  ■ ७०० + १०० = ८००
६० + २० = ८०  ■ ६०० + २०० = ८००
५० + ३० = ८०  ■ ५०० + ३०० = ८००
४० + ४० = ८०  ■ ४०० + ४०० = ८००
८० + १० = ९०  ■ ८०० + १०० =९००
७० + २० = ९०  ■ ७०० + २०० = ९००
६० + ३० = ९०  ■ ६०० + ३०० = ९००
५० + ४० = ९०  ■ ५०० + ४०० = ९००
९० + १० = १००■ ९००+१००= १०००
८० + २० = १००■ ८००+२००= १०००
७० + ३० = १००■ ७००+३००= १०००
६० + ४० = १००■ ६००+४०० = १०००
५० + ५० = १००■ ५००+५०० = १०००
==========================
  लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि.प.प्रा. शाळा- बांडीकुहेर
              ता. साक्री जि. धुळे
              ९४२२७३६७७५

Friday, 29 December 2017

भाषिक उपक्रम

एक शब्दाच्या अक्षरापासून अनेक
        शब्द बनविणे.
--------------------------------------------------

  ' समान ' या शब्दातील अक्षरे घेऊन पुढील
सार्थक शब्द बनतात.  मान,  सन, मास, मानस,
नस .
  खालील असे मूळ शब्द व त्यापासून बनविलेले
सार्थक शब्द दिले आहेत.

(१) तलवार  --
     वाल,  वार,  वात,  तर,  तवा, रवा, तरल.

(२) आठवडा --
    आठ,  वडा, आठव, डाव, आव.

(३) सरपण --
     सर,  पण,  सण, रण, रस,  पसर.

(४) गायरान --
      गाय, रान,  गान,  गारा.

(५) यवतमाळ --
     माळ,  तळ,  तव,  मात,  माय,  वय.

(६) नवनीत --
     नव,  वनी,  वन,  वतन,  तन.

(७) हवामान --
     हवा,  मान, वान, नवा.

(८) नागपूर  --
     नाग, पूर,  नार,  गर , पू.

(९) पसरट --
      पर , सर,  पट,  टर,  रस,  सट,  पसर.

(१०) वासरू --
        वास,  सरू, वारू.

(११) अहमदनगर --
       अहमद , नगर, नर , नग , मन, मदन,
       मगर, दम,  हरण, गरम.

(१२) ताजमहाल --
      ताज,  महाल, हाल,  महा, ताल, जहाल,
       लता,  मल.

(१३) महाभारत --
      महा, भारत, भार, मत, भात,
      हात, मर,  रहा.

(१४) यशवंतराव --
      यश, यशवंत, राव, तवा, वरात, वंश,
      रात, वय.
--------------------------------------------------

 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा - बांडीकुहेर
                ता.साक्री जि. धुळे
                 ९४२२७३६७७५

Thursday, 28 December 2017

  याला काय म्हणतात ?

          याला काय म्हणतात  ?
            

           प्रश्न                      उत्तर
(१) नारळाचे झाड  --        माड .

(२) नारळाच्या फांद्या  --   झावळी

(३) सिमेंट तयार करण्यासाठी लागणारा
     कच्चा माल  --     चुनखडक.

(४) मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
                    
(५) प्राणी पाळणे  --      पशुपालन

(६) माणूस चंद्रावर गेला ते साधन --  अंतराळयान

(७) ' अश्म ' म्हणजे  -- दगड

(८) जंगलातील मोठ्या प्रमाणातील आग -- वणवा
          
(९) थंडीत उबेसाठी पेटवतात -- शेकोटी

(१०) रुळावरून धावणारे वाहन - आगगाडी.

(११) पृथ्वीचा आकार  -- गोल

(१२) तालुक्याला असेही म्हणतात --   तहसील

(१३) नदीचे काठ  -- तीर  / थडी.

(१४) खाणीतून काढलेले पदार्थ --  खनिज

(१५) माश्यांना असेही म्हणतात --  मासळी.

(१६) वनस्पतीचा जमिनीत वाढणारा भाग -- मूळ
         
(१७) उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह -- धबधबा
                                
(१८) किल्ल्याच्या सभोवतालची भिंत -- तट.

(१९) कैदी ठेवण्याची जागा --  तुरुंग

(२०) चार रस्ते एकत्र येतात ती जागा --  चौक

(२१) जमिनीखालील गुप्त मार्ग --  भुयार

(२२) जमिनीवर राहणारे प्राणी -- भूचर

(२३) जमिन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी
        राहणारे प्राणी  -- उभयचर

(२४) पाण्यात राहणारे प्राणी --    जलचर

(२५)दगडावर/दगडाच्या मूर्ती घडवणारा-- शिल्पकार
                            
(२६) दगडावर कोरलेले लेख -- शिलालेख

(२७) तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण - तिठा
                    
(२८) न्यायनिवाडा करणारा  -- न्यायाधीश

(२९) प्रचंड वेगाने वाहणारा वारा -- वादळ

(३०) सायकलच्या ट्युबमध्ये असणारा
        वायू पदार्थ  -- हवा.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता. ९४२२७३६७७५

     
                

Saturday, 23 December 2017

खरेदी-विक्री /नफा -तोटा गणितीय माहिती

खरेदी-विक्री /नफा -तोटा गणितीय माहिती

(१)वस्तू विकत घेणे म्हणजे वस्तूची खरेदी
      करणे.

(२)वस्तू विकणे म्हणजे वस्तूची विक्री करणे.

(३)खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त
     असल्यास नफा झाला असे म्हणतात.

(४)खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत कमी
     असल्या तोटा झाला असे म्हणतात. 
  ----------------------------------------------------
◾ खरेदी किंमत --
    एखादी वस्तू ठराविक किंमत/रक्कम देऊन
    विकत घेतात, त्या किमतीला खरेदी किंमत
    असे म्हणतात.
उदा.  सुमितने १० रू. ला पेन विकत घेतला .
       १० रुपये ही पेनाची खरेदी किंमत.
----------------------------------------------------

◾ विक्री किंमत --
    एखादी वस्तू ज्या किमतीत /रक्कमेत
    विकली जाते, त्या किमतीला विक्री
   किंमत असे म्हणतात.
उदा.  दुकानदाराने वही १५ रू. ला विकली.
    १५ रूपये ही वहीची विक्री किंमत झाली.
--------------------------------------------------

◾ नफा --
    जेव्हा एखाद्या व्यवहारात खरेदी किंमत
    विक्री किमतीपेक्षा कमी असते तेव्हा
    नफा झाला असे म्हणतात.
उदा.  एक पेन १० रू. ला घेतला व १५ रू.
   ला विकला, तर ५ रुपये नफा झाला.

◾ तोटा --
    एखाद्या व्यवहारात जेव्हा खरेदी किंमत
    विक्री किमतीपेक्षा जास्त असते, तेव्हा
    तोटा झाला असे म्हणतात.
उदा. १५ रु. ला घेतलेला पेन १० रूपयाला
    विकला तर  ५ रूपये तोटा झाला .
-----------------------------------------------------

संकलन:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
             जि.प. प्रा. शाळा बांडीकुहेर
            ता.साक्री जि.धुळे
            📞 ९४२२७३६७७५
 

Friday, 22 December 2017

कोण ते ओळखा .

(१) त्याचा रंग काळा आहे.
     तो काव काव ओरडतो .
     इकडून तिकडे उडत जातो.
-------------------------------------------
(२) त्याचा आकार गोल आहे.
      ते टिक् टिक् टिक् करते.
     सगळ्यांना वेळ दाखवते.
--------------------------------------------
(३) त्याचा रंग हिरवा असतो.
      वारा आला की हलते.
      उन्हाळ्यात आपल्याला सावली देते.
---------------------------------------------
(४) ते कागदाचे असते.
      त्यात चित्र असतात, गोष्टी असतात.
      आपल्या दप्तरात ते असते.
----------------------------------------------
(५) कमी कमी होत जाते,
      पूजा असो वा पंगत,
      देत असते मी सुगंध.

----------------------------------------------
 उत्तरे :- (१) कावळा, (२) घड्याळ
 (३)झाड, (४)पुस्तक,(५) अगरबत्ती

----------------------------------------------
 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                 ९४२२७३६७७५

आपले सण (थोडक्यात माहिती)

(१) होळी --

  होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला असतो.
होळीचा सण दोन दिवस साजरा करतात.
पहिल्या दिवशी घरापुढे अंगण सारवून त्यावर
लाकडे व गोव-या रचून होळी तयार करतात.
संध्याकाळी होळी पेटवून तिची पूजा करतात.
तिला नैवेद्य अर्पण करतात. होळी म्हणजे
हुताशनी देवी आहे असे मानतात. ती होळी-
बरोबर सर्व वाईटांचा जाळून नाश करते असा
समज आहे. वर्गणी काढून सार्वजनिक होळीही
अनेक ठिकाणी साजरी करतात.
       होळीच्या दुसर्‍या दिवसाला धुलिवंदन
म्हणतात. त्या दिवशी रंग उडवून खेळ खेळतात.
दोन्ही दिवस गोडाचे जेवण करतात व आनंदाने
होळीचा सण साजरा करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(२) दिवाळी --

  आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक वद्य द्वितीया
हे पाच दिवस दिवाळी असते. या काळात
पाचही दिवस घरापुढे पणत्या लावून दिव्यांची
आरस करतात. म्हणूनच त्या सणाला दिवाळी
किंवा दीपावली असे म्हणतात. उंच ठिकाणी
आकाशकंदीलही लावतात. दाराला तोरण
बांधून दारापुढे रांगोळी काढतात.
        दिवाळीसाठी लोक नवे कपडे घेतात.
दागदागिने करतात, लाडू, करंज्या,चकल्या
वगैरे फराळाचे जिन्नस बनवतात. फळे, मिठाई
आणतात. फटाके, फुलबाज्या यांचा तर
धुमधडाका चालू असतो.
   दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज हे
दिवस महत्वाचे असतात. भाऊबिजेला बहीण
भावाला ओवाळते. ओवाळणी म्हणून भाऊ
बहिणीला साडी किंवा काही भेटवस्तू देतो.
   दिवाळी हा सण श्रीमंतांपासून गरिबांपर्यत
सर्वांचा आवडता सण आहे. आपली दुःखे
विसरून सर्वजण हा सण आनंदाने साजरा
करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(३)  नाताळ --

   नाताळ हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे.
२५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला.
म्हणून हा सण साजरा करतात. २४ डिसेंबर -
पासून १ जानेवारीपर्यंत नाताळ असतो.
   नाताळच्या सणासाठी लोक आपली घरे
साफसूफ करतात व सजवितात. ख्रिसमस
ट्री उभी करतात. खेळणी व विजेच्या दिव्यांच्या
माळा लावून ती सुशोभित करतात. ख्रिसमस
केक बनवितात.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री लोक
चर्चमध्ये जमतात. लहान मुले झोपी जाताना
आपल्या अंथरुणांजवळ आपले रिकामे मोजे
ठेवतात. लाल कपडे घातलेला पांढरीशुभ्र दाढी
असलेला सांताक्लाॅज आपल्या मोज्यात
आपल्यासाठी बक्षीस ठेवणार अशी त्यांची
अपेक्षा असते.
   २५ डिसेंबर हा नातेवाईकांच्या गाठीभेटीचा
दिवस असतो. त्या दिवशी मित्रमंडळीना व
नातेवाईकांना शुभेच्छा देतात. भेटवस्तू देतात.
अशा प्रकारे नाताळ आनंदाने साजरा करतात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(४) ईद --

     ईद हा मुसलमानांचा सण आहे. वर्षातून
खास रमजान ईद व बकरी  ईद या दोन ईद
ते साजऱ्या करतात.
  रमजान ईदमध्ये आकाशात चंद्राचे दर्शन
झाल्यावर मुसलमान रोजे  (उपवास)
पाळतात, आणि नमाज पढतात. हे रोजे एक
महिन्यानंतर परत चंद्राचे दर्शन झाल्यावरच
सोडतात व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर
उठून आंघोळ करून मशिदीत जातात व
नमाज पडतात.
   बकरी ईद हजरत इस्माईलच्या बलिदानाची
आठवण म्हणून साजरी करतात. दोन्ही ईदच्या
वेळी मुसलमान लोक नवे कपडे घालून
मशिदीत  जातात. व नमाज पडतात. त्यानंतर
एकमेकांना आलिंगन देऊन गाठीभेटी घेतात.
' ईद मुबारक ' म्हणून एकमेकांना शुभेच्छा
देतात. प्रत्येकाच्या घरी शीरकुरमा करतात
वे घरी आलेल्या प्रत्येक माणसाचे शीर- कुरमा
देऊन स्वागत करतात. बकरी ईदच्या दिवशी
मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात.
   थोडक्यात ईदच्या सणांमुळे प्रेम, एकात्मता
व बंधुभाव वाढीस लागतो.
============================
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि.धुळे
              ९४२२७३६७७५

Monday, 18 December 2017

Name,  Animal,  Thing

   Write the Name,  Animal  and  Thing beginning with following letters .
-----------------------------------------------
Letter - Name -    Animal -    Thing
-----------------------------------------------
'S' =       Suman    -  Sheep  -      Shoes
'R' =        Raju    -    Rabbit  -      Ring
'B' =        Bina    -     Bear    -     book
'M' =     Manoj   -  Monkey -     mug
'L'  =       Lata     -    Lion     -    Lamp
'O' =       Om       -     Ox       -    Onion
'C'=    Chandu    -   Cow      -    Car
'T' =      Tanu      -   Tiger    -    Tin
'W' = Washim   -    Wolf    -   Watch
'D' =  Dinesh      -   Dog      -     Doll
'H'  = Heena      -  Horse   -   Hook
'K' = Kalpana   - Kangaroo - Key
'Z'  =   Zalak    -    Zebra    -     Zip
'A'  =  Ajay       -      Ass       -   Apple
'F' = Falguni   -      Fish      -   Fan
=============================
   
Shankar  Chaure (Teacher)
    Z. P. School Bandikuher
    Tal. Sari  Dist.  Dhule
    9422736775

वनस्पतींचे उपयोग सांगा पाहू !

(१)निलगिरी :--

-- निलगिरीची वाळलेली पाने आणि निलगिरी-
पासून बनवलेले तेल या दोन्हींचा उत्तम औषध
म्हणून वापर होतो. निलगिरीच्या वृक्षांचे
लाकूडही उपयुक्त असते. खोडापासून कागदही
बनवतात.
--------------------------------------------------
(२) आले  :-

- आले स्वयंपाकात वापरले जाते. तसेच
 औषध म्हणूनही उपयोग होतो.
--------------------------------------------------
(३) साग :-

- सागाच्या लाकडापासून फर्निचर बनवले
जाते. घराच्या बांधणीत खिडक्या- दारे
बनवण्यासाठी सागाचे लाकूड लागते.
--------------------------------------------------
(४) कोरफड  :-

- कोरफड ही औषधी वनस्पती आहे.
निरनिराळ्या त्वचा रोगांवर आणि भाजणे,
कापणे अशा जखमांवर कोरफड अत्यंत
गुणकारी असते.
--------------------------------------------------
(५) हळद :-

- हळद ही स्वयंपाकात रोजच वापरली जाते.
हळदीला अनेक औषधी गुणधर्म आहेत.
--------------------------------------------------
(६) आंबा :--

- आंब्यापासून आमरस, जॅम , लोणची ,
सरबत अशी विविध उत्पादने देखील तयार
करतात. प्रत्येक मंगल प्रसंगी तोरणांमध्ये
आंब्याच्या झाडाची पाने वापरली जातात.
--------------------------------------------------
(४) तुळस  :--

- तुळस ही औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात
तुळशीपासून अनेक औषधे बनवली जातात.
--------------------------------------------------
(५) महू  :-

- मोहाचे वृक्ष जंगली प्रदेशात आढळून येतात.
मोहाची फुले आणि बिया यांच्या पासुन औषधे
व इतर द्रव्य तयार करण्यात येतात.
--------------------------------------------------
(६) द्राक्ष :-

- द्राक्ष हे लोकप्रिय फळ वेलींवर उगवते.
 द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रात सर्वाधिक होते.
द्राक्षे वाळवून त्यांचे बेदाणे करतात.
--------------------------------------------------
(७) नारळ :-

- नारळाच्या झाडाला माड म्हणतात.
नारळापासून खोबरे मिळते. खोबऱ्याचे तेलही
काढतात. नारळाच्या करंवटीपासून शोभेच्या
वस्तू बनवतात. सोडणापासून(नारळावरील
तंतुमय आवरण) काथ्या, दोर,  पायपुसणी,
ब्रश, चट्या बनवतात. माडाच्या फांदीला
झावळी म्हणतात. त्यांच्या केरसुण्या बनवतात.
माडाच्या खोडाचा वासे व पन्हाळीसाठी
उपयोग होतो. अशा प्रकारे माडाच्या प्रत्येक
भागाचा उपयोग केला जातो. म्हणून माडाला
कल्पवृक्ष म्हणतात.
--------------------------------------------------
(८) सुबाभूळ  :--

-- सुबाभूळीची पाने जनावरांना खाण्यासाठी
वापरतात. याचा इमारती लाकूड म्हणून
उपयोग होतो, कारण हे लाकूड टणक व
ताकदवान असते. कागद बनविण्यासाठी सुध्दा
सुबाभूळीचा उपयोग होतो. या झाडाच्या बिया,
साल व पाने यांपासून रंग काढता येते.
--------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता. साक्री जि.धुळे
               ¤ ९४२२७३६७७५

Sunday, 17 December 2017

चला आपण ' बेडूक ' या प्राण्याची माहिती घेऊया !


बेडूक :-                          
        जगात बहुतेक सर्व ठिकाणी बेडूक
हा प्राणी आढळतो. पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा प्राण्यांमध्ये बेडकाची गणना होते. देश, काल, ऋतुमानाप्रमाणे त्याची भिन्न -भिन्न रूपे,आकार आणि आहारविहार आढळतो. बेडूक जलचर आणि स्थलचर असतात. गाव आणि जंगलातील पाणथळ जमिनीत राहणे बेडकाला अधिक आवडते. परंतु जलजीवनाचा संपूर्ण त्याग तो करू शकत नाही. बेडूक आळशांचा राजा आहे;  परंतु तो पिकांवरील जंतूचा नाश करणारा आहे. तो शेतकऱ्यांचा जिवलग मित्र आहे.
=============================
बेडकाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात ?
  
       शेतकर्‍याच्या शेतात जेवढे जंतू पिकांचे शत्रू आहेत, त्या सर्वांचा बेडूक हा शत्रू आहे.
पीकनाशक कीटकांचा स्वाह करून तो
शेतकऱ्यांवर उपकार करतो.उन्हाळ्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत एक बेडूक पिकांचा नाश करणार्‍या सुमारे १०,००० किड्यांचा नाश करतो. शेतकऱ्यांचे प्रचंड धान्य तो वाचवतो. बेडूक हा शेतातील पिकांचे रक्षण करतो व शेतकऱ्याला सहकार्य करतो, म्हणून त्याला शेतकऱ्याचा विश्वासू मित्र म्हटले आहे.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                 ९४२२७३६७७५

Friday, 15 December 2017

फरक सांगा.

(१) तारे व ग्रह फरक सांगा.

- तारे लुकलुकतात; तर ग्रह लुकलुकत नाही.
तारे स्वयंप्रकाशित असतात; ग्रहांना स्वतःचा
प्रकाश नसतो.
--------------------------------------------------
(२) पौर्णिमेची रात्र व अमावास्येची रात्र
      फरक सांगा.

- ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या रात्रीला
   पौर्णिमेची रात्र म्हणतात.
- चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला
  अमावास्येची रात्र म्हणतात.
---------------------------------------------------
(३) सजीव व निर्जीव फरक सांगा.

- अन्न,पाणी आणि हवा यांची गरज    असलेल्या वस्तू सजीव असतात.
  सजीवांची वाढ होते.
- अन्न, पाणी आणि हवा यांची गरज 
   नसलेल्या वस्तू निर्जीव असतात.निर्जीवांची    वाढ होत नाही.
--------------------------------------------------
(४)हाताची बोटे आणि पायांची बोटे
     यांतील फरक सांगा .

-- हातांची बोटे लांब असतात.
-- हातांच्या बोटांचा अंगठा इतर बोटांच्या
   समोरच्या बाजूस करतो येतो.
-- पायांची बोटे आखूड असतात.
-- पायांच्या बोटांचा अंगठा इतर बोटांच्या
    समोरच्या बाजूस करता येत नाही.

-------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                  ९४२२७३६७७५

Thursday, 14 December 2017

ओळखा पाहू ! (कोण हा पक्षी ? )

   
(१) कोण हा पक्षी ,
       अंगावर ज्याच्या इंद्रधनूची नक्षी !
-----------------------------------------------
(२)कोण हा पक्षी, न चुकता रोज पहाटे
         उठवतो सर्वा अक्षी !
----------------------------------------------
(३) कोण हा पक्षी,
         गाणं ह्याचं वसताचं साक्षी  !
---------------------------------------------
(४) कोण हा पक्षी ,
         हा तर पिंडदान भक्ष्यी  !
---------------------------------------------
(५) कोण हा पक्षी,
    ढगांची गर्दी पाहून, नाचाचा साक्षी  !
--------------------------------------------
(६) कोण हा पक्षी ,
  ही उडते आभाळी,चित्त हिचे पिलांपाशी !
--------------------------------------------------
(७) कोण हा पक्षी,
  हा तर संस्कृतमधील 'काक' ऋषी
-------------------------------------------------
उत्तरे :-(१) मोर , (२) कोंबडा,  (३) कोकीळ
         (४) कावळा, (५) मोर,   (६) घार,
         (७) कावळा.
  • ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री, जि. धुळे
                 ९४२२७३६७७५

ओळखा पाहू ! (कोण हा पक्षी ? )

   

(१) कोण हा पक्षी ,
       अंगावर ज्याच्या इंद्रधनूची नक्षी !

-----------------------------------------------
(२)कोण हा पक्षी, न चुकता रोज पहाटे
         उठवतो सर्वा अक्षी !

----------------------------------------------
(३) कोण हा पक्षी,
         गाणं ह्याचं वसताचं साक्षी  !

---------------------------------------------
(४) कोण हा पक्षी ,
         हा तर पिंडदान भक्ष्यी  !

---------------------------------------------
(५) कोण हा पक्षी,
    ढगांची गर्दी पाहून, नाचाचा साक्षी  !

--------------------------------------------
(६) कोण हा पक्षी ,
  ही उडते आभाळी,चित्त हिचे पिलांपाशी !

--------------------------------------------------
(७) कोण हा पक्षी,
  हा तर संस्कृतमधील 'काक' ऋषी

-------------------------------------------------
उत्तरे :-(१) मोर ,      (२) कोंबडा,  (३) कोकीळ
         (४) कावळा, (५) मोर,       (६) घार,
         (७) कावळा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री, जि. धुळे
                 ९४२२७३६७७५

प्रत्येकासाठी एकेक शब्द सांगा.

-------------------------------------------------
(१) शरीरात रक्त सतत फिरते ठेवण्याचे
      काम करतो.
--- हृदय.
------------------------------------------------
२) शरीरात सुसूत्रता ठेवण्याचे काम करतो.
--- मेंदू .
-------------------------------------------------
(३) हलणारी हवा.
---  वारा.
------------------------------------------------
(४) ज्ञान देणारे अवयव.
---  ज्ञानेंदिय.
------------------------------------------------
(५)अगदी लहानपणी बाळाला येणारे दात.
---  दूधदात.
----------------------------------------------
(६) घरटी बांधणारे.
--- पक्षी.
----------------------------------------------
(७)कोळी किड्याला किती पाय.
--- आठ
----------------------------------------------
(८) वेगाने धावणारा पक्षी.
--- शहामृग.
----------------------------------------------
(८)परांची हालचाल करून पाण्यात पोहणारे
--- मासे
----------------------------------------------
(९) नैसर्गिक सपाट जमीन.
--- मैदान
----------------------------------------------
(१०)लाकडाचा अर्धवट जळून तयार
       होणारा पदार्थ.
--- कोळसा.
--------------------------------------------
(११)पदार्थ द्रवात विरघळ्याची क्रिया.
--- विरघळणे.
-----------------------------------------
(१२)खाणीतून मिळणारा पदार्थ.
--- खनिज .
----------------------------------------------
(१३)  उंचवट्याचा भाग.
--- टेकडी
------------------------------------------------
(१४) पृथ्वीचा आकार.
--- गोल
-----------------------------------------------
(१५)सर्वांत उंच वाढणारे गवत.
--- बांबू
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
               ता.साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Wednesday, 13 December 2017

घड्याळ प्रश्नावली.

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

(१) १ मिनिटात सेकंद काटा पूर्ण गोल किती
      फेऱ्या मारतो  ?

(२) १ तासात सेकंद काटा पूर्ण गोल किती
      फेर्‍या मारतो  ?
(३) १ दिवसात सेकंद काटा पूर्ण गोल किती
     फेऱ्या मारतो  ?
(४) १ साध्या वर्षात सेकंद काटा पूर्ण गोल
      किती फेर्‍या मारतो  ?
(५) १ लिप वर्षात सेकंद काटा पूर्ण गोल
      किती फेऱ्या मारतो  ?
(६) १ तासात मिनिट काटा किती फेऱ्या
     पूर्ण मारतो  ?
(७) १ दिवसात मिनिट काटा किती फेऱ्या
     पूर्ण मारतो  ?
(८) १ साध्या वर्षांत मिनिट काटा किती
      फेऱ्या पूर्ण मारतो  ?
(९) १ लिप वर्षांत मिनिट काटा किती
       फेऱ्या पूर्ण मारतो  ?
(१०) तास काटा एका दिवसात किती गोल
       फेऱ्या मारतो  ?
(११) एका साध्या वर्षांत तास काटा किती
       गोल फेऱ्या मारतो  ?
(१२) एका लिप वर्षात तास काटा किती
        गोल फेऱ्या मारतो  ?
--------------------------------------------------
  उत्तरे -(१) १ फेरी , (२) ६० फेऱ्या,
   (३) १४४० फेऱ्या, (४) ५,२५,६०० फेऱ्या
   (५) ५,२७,०४० फेऱ्या, (६) १ फेरी,
   (७) २४ फेऱ्या, (८) ८७६० फेऱ्या
    (९) ८७८४ फेऱ्या, (१०) २ फेऱ्या
   (११) ७३० फेऱ्या, (१२) ७३२ फेऱ्या.

--------------------------------------------------

संकलन - शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा - बांडीकुहेर
               ता. साक्री जि. धुळे

Monday, 11 December 2017

पाव, अर्धा,  पाऊण, एक, सव्वा


(१)एक डझन = १२ वस्तू
(२)पाऊण डझन = ९ वस्तू
(३)अर्धा डझन = ६ वस्तू
(४)पाव डझन = ३ वस्तू
(५) सव्वा  डझन = १५ वस्तू
(६) एक हजार = १०००
(७) पाऊण हजार = ७५०
(८)अर्धा हजार  =५००
(९) पाव हजार  = २५०
(१०) सव्वा हजार = १२५०
(११) एक मीटर = १०० सेमी
(१२) पाऊण मीटर = ७५ सेमी
(१३) अर्धा मीटर = ५० सेमी
(१४) पाव मीटर = २५  सेमी
(१५) सव्वा मीटर = १२५ सेमी
(१६) एक किलोमीटर = १००० मीटर
(१७) पाऊण किलोमीटर = ७५०
(१८)अर्धा किलोमीटर = ५०० मीटर
(१९) पाव किलोमीटर = २५० मीटर
(२०) सव्वा किलोमीटर = १२५० मीटर
(२१) एक क्विंटल = १०० कि.ग्रॅ.
(२२) पाऊण क्विंटल = ७५ कि.ग्रॅ.
(२३) अर्धा क्विंटल = ५० कि.ग्रॅ.
(२४) पाव क्विंटल = २५ कि.ग्रॅ.
(२५) सव्वा क्विंटल = १२५ कि. ग्रॅ.
(२६) एक लीटर = १००० मिली
(२७) पाऊण लीटर = ७५० मिली
(२८) अर्धा लीटर = ५०० मिली
(२९) पाव लीटर = २५० मिली
(३०) सव्वा लीटर = १२५० मिली.
(३१) एक मिनिट = ६० सेकंद
(३२) पाऊण मिनिट = ४५ सेकंद
(३३) अर्धा मिनिट = ३० सेकंद
(३४) पाव मिनिट = १५ सेकंद
(३५) सव्वा मिनिट = ७५ सेकंद
(३६) एक तास = ६० मिनिटे
(३७) पाऊण तास = ४५ मिनिटे
(३८) अर्धा तास = ३० मिनिटे
(३९) पाव तास = १५ मिनिटे
(४०) सव्वा तास = ७५ मिनिटे
(४१) एक दिवस = २४ तास
(४२) पाऊण दिवस = १८ दिवस
(४३) अर्धा दिवस = १२ तास
(४४) पाव दिवस = ६ तास
(४५) सव्वा दिवस = ३० तास
(४६) एक वर्षे = १२ महिने
(४७) पाऊण वर्षे = ९ महिने
(४८) अर्धा वर्षे = ६ महिने
(४९) पाव वर्षे = ३ महिने
(५०) सव्वा वर्षे = १५ महिने
(५१) एक शेकडा = १००
(५२) पाऊण शेकडा = ७५
(५३) अर्धा शेकडा = ५०
(५४) पाव शेकडा = २५
(५५) सव्वा शेकडा = १२५
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
               ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५  

Friday, 8 December 2017

आमच्या मनातील कुतूहल(का व कसे ?)

(१) दव म्हणजे काय  ?

- रात्रीच्या वेळी जमीन थंड होताच तिच्याजवळ
असणारी हवेतील वाफही थंड होते. त्याबरोबर
या वाफेचे रूपान्तर पाण्यात होऊन ती जवळ-
च्या वस्तूवर साचते. खडक, जमीन, वनस्पती,
छप्पर यांवर पाण्याचा पातळसर थर साचून
राहतो. पानांवर पाणी थेंबांच्या रूपात साचते.
आपण त्यांना 'दवबिंदू ' असे म्हणतो. ' दव
पडले ' असे आपण म्हणतो ते बरोबर नाही.
दव साचले असेच म्हटले पाहिजे.जमिनीवरील
थंड वस्तूंवर ते रात्रभर राहते. सूर्योदयाबरोबर
पानांवर ते चकाकू लागते. सूर्य वर येताच
वस्तू तापतात आणि त्यावरील दवाची वाफ
होते. रात्र होताच हवेतील थंडाव्यामुळे या
वाफेचे दव बिंदू होतात. दव निर्माण होण्यासाठी
हवेत उबदार आर्द्रता असावी लागते. अशी
हवा थंड पृष्ठभागाच्या सान्निध्यात असावी
लागते. दव बिंदू पाने, गवत यांवर दिसते.

(२)नवे कपडे धुतल्यानंतर का आक्रसते  ?
-- कापड तयार करताना शेवटच्या टप्प्यात
त्यावर स्टार्चची क्रिया केली जाते. त्यामुळे
कापड कडक बनते. असे नवे कापड जेव्हा
आपण पाण्यात टाकतो. तेव्हा त्यावरचे स्टार्च
निघून गेल्याने कापडाचे धागे सैल होतात व ते
एकमेकांच्या जास्त जवळ येतात.
   कापडाचे धागे एकमेकांच्या जास्त जवळ
आल्याने कापड आक्रसते.

संकलन:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                 ९४२२७३६७७५

Tuesday, 5 December 2017

शोध घ्या . (सामान्यज्ञान )

(१)चलनी नोटांचा कागद कसा तयार
     केलेला असतो  ?
-- आपल्या देशात चलनी नोटा या कापसाचा
 लगदा, तेरड्याचे खोड आणि खास प्रकारचे
 रंग वापरून तयार केल्या जातात. काही नोटा
स्टार्चमिश्रित कागद आणि त्यात कापड तयार
करायचे धागे वापरूनही केल्या जातात. नोटा
तयार करते वेळी त्यांना जिलेटीनचा थर दिला
जातो. त्यामुळे त्या कुरकुरीत व कडक
राहतात.
-------------------------------------------------
(२) ' मोती ' हे रत्न कसे मिळवतात  ?
-- ' मोती ' हे रत्न शिंपल्यात बनते. नैसर्गिकरीत्या
 कोणताही परकीय कण प्रजातीच्या शिंपल्यात
शिरला की, त्याच्या सभोवताली कॅन्कर नावाच्या
पदार्थाचे थर टाकले जातात. त्यातून मोती तयार
होतो. कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत पर्ल आॅयस्टर
या शिंपल्यासारख्या प्राण्याच्या शरीरात मणीवजा
वस्तू टाकली जाते आणि त्याच्या वर हा प्राणी
कॅन्करची आवरणे टाकतो. अशा रितीने कल्चर्ड
मोती तयार केला जातो.

--------------------------------------------------
(३) मीठ कसे तयार करतात  ?
-- मीठ समुद्राच्या किनारी असलेल्या मिठागरांत
 तयार होते. मिठागरे समुद्रकिनारी उथळ जागेत
असतात .समुद्राचे खारट पाणी या जागेत साठवून
ठेवले जाते. उन्हाने या पाण्याचे बाष्पीभवन होते.
बाष्पीभवनने साठवून ठेवलेल्या सगळ्या
पाण्याची वाफ होते आणि त्या जागी मीठ शिल्लक
राहते.

--------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Sunday, 3 December 2017

आपल्या मनातील कुतूहल (सामान्यज्ञान)


(१)रीम हे कशाचे माप आहे ?

-- रीम हे कागद मोजण्याचे माप आहे.
   एका रीममध्ये ४८० कागद असतात.
------------------------------------------------

(२)पाणी आणि पेट्रोल यांचे मिश्रण कसे*
    *वेगळे कराल ?

-- पाणी आणि पेट्रोल हे पदार्थ एकमेकांत
   मिसळत नाहीत. ते एकत्र केल्यास त्यांचे
   दोन स्वतंत्र थर दिसतात. पेट्रोल हलके
   असल्यामुळे ते पाण्यावर तरंगते. नंतर ते
   अलगत बाजूला काढून घेता येते.
--------------------------------------------------

(३)एक मोजपट्टी आणि दोरी यांच्या साहाय्याने चेंडूचा परीघ कसा मोजाल  ?

-- चेंडूच्या मध्यभागाभोवती दोरी गुंडाळावी
   लागेल. जेवढी दोरीची लांबी होईल, तेवढा
   चेंडूचा परीघ असेल.
-----------------------------------------------------

(४)मालमोटारींमध्ये भरून आणलेल्या ऊसाचे वस्तुमान कोणत्या एककात नोंदवतात  ?

-- वस्तुमान टनामध्ये किंवा क्विंटलमध्ये
  मोजतात.
--------------------------------------------------

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि. धुळे
                  ९४२२७३६७७५