(१)निलगिरी :--
-- निलगिरीची वाळलेली पाने आणि निलगिरी-
पासून बनवलेले तेल या दोन्हींचा उत्तम औषध
म्हणून वापर होतो. निलगिरीच्या वृक्षांचे
लाकूडही उपयुक्त असते. खोडापासून कागदही
बनवतात.
--------------------------------------------------
(२) आले :-
- आले स्वयंपाकात वापरले जाते. तसेच
औषध म्हणूनही उपयोग होतो.
--------------------------------------------------
(३) साग :-
- सागाच्या लाकडापासून फर्निचर बनवले
जाते. घराच्या बांधणीत खिडक्या- दारे
बनवण्यासाठी सागाचे लाकूड लागते.
--------------------------------------------------
(४) कोरफड :-
- कोरफड ही औषधी वनस्पती आहे.
निरनिराळ्या त्वचा रोगांवर आणि भाजणे,
कापणे अशा जखमांवर कोरफड अत्यंत
गुणकारी असते.
--------------------------------------------------
(५) हळद :-
- हळद ही स्वयंपाकात रोजच वापरली जाते.
हळदीला अनेक औषधी गुणधर्म आहेत.
--------------------------------------------------
(६) आंबा :--
- आंब्यापासून आमरस, जॅम , लोणची ,
सरबत अशी विविध उत्पादने देखील तयार
करतात. प्रत्येक मंगल प्रसंगी तोरणांमध्ये
आंब्याच्या झाडाची पाने वापरली जातात.
--------------------------------------------------
(४) तुळस :--
- तुळस ही औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात
तुळशीपासून अनेक औषधे बनवली जातात.
--------------------------------------------------
(५) महू :-
- मोहाचे वृक्ष जंगली प्रदेशात आढळून येतात.
मोहाची फुले आणि बिया यांच्या पासुन औषधे
व इतर द्रव्य तयार करण्यात येतात.
--------------------------------------------------
(६) द्राक्ष :-
- द्राक्ष हे लोकप्रिय फळ वेलींवर उगवते.
द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रात सर्वाधिक होते.
द्राक्षे वाळवून त्यांचे बेदाणे करतात.
--------------------------------------------------
(७) नारळ :-
- नारळाच्या झाडाला माड म्हणतात.
नारळापासून खोबरे मिळते. खोबऱ्याचे तेलही
काढतात. नारळाच्या करंवटीपासून शोभेच्या
वस्तू बनवतात. सोडणापासून(नारळावरील
तंतुमय आवरण) काथ्या, दोर, पायपुसणी,
ब्रश, चट्या बनवतात. माडाच्या फांदीला
झावळी म्हणतात. त्यांच्या केरसुण्या बनवतात.
माडाच्या खोडाचा वासे व पन्हाळीसाठी
उपयोग होतो. अशा प्रकारे माडाच्या प्रत्येक
भागाचा उपयोग केला जातो. म्हणून माडाला
कल्पवृक्ष म्हणतात.
--------------------------------------------------
(८) सुबाभूळ :--
-- सुबाभूळीची पाने जनावरांना खाण्यासाठी
वापरतात. याचा इमारती लाकूड म्हणून
उपयोग होतो, कारण हे लाकूड टणक व
ताकदवान असते. कागद बनविण्यासाठी सुध्दा
सुबाभूळीचा उपयोग होतो. या झाडाच्या बिया,
साल व पाने यांपासून रंग काढता येते.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि.धुळे
¤ ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment