याला काय म्हणतात ?
प्रश्न उत्तर
(१) नारळाचे झाड -- माड .
(२) नारळाच्या फांद्या -- झावळी
(३) सिमेंट तयार करण्यासाठी लागणारा
कच्चा माल -- चुनखडक.
(४) मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
(५) प्राणी पाळणे -- पशुपालन
(६) माणूस चंद्रावर गेला ते साधन -- अंतराळयान
(७) ' अश्म ' म्हणजे -- दगड
(८) जंगलातील मोठ्या प्रमाणातील आग -- वणवा
(९) थंडीत उबेसाठी पेटवतात -- शेकोटी
(१०) रुळावरून धावणारे वाहन - आगगाडी.
(११) पृथ्वीचा आकार -- गोल
(१२) तालुक्याला असेही म्हणतात -- तहसील
(१३) नदीचे काठ -- तीर / थडी.
(१४) खाणीतून काढलेले पदार्थ -- खनिज
(१५) माश्यांना असेही म्हणतात -- मासळी.
(१६) वनस्पतीचा जमिनीत वाढणारा भाग -- मूळ
(१७) उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह -- धबधबा
(१८) किल्ल्याच्या सभोवतालची भिंत -- तट.
(१९) कैदी ठेवण्याची जागा -- तुरुंग
(२०) चार रस्ते एकत्र येतात ती जागा -- चौक
(२१) जमिनीखालील गुप्त मार्ग -- भुयार
(२२) जमिनीवर राहणारे प्राणी -- भूचर
(२३) जमिन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी
राहणारे प्राणी -- उभयचर
(२४) पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर
(२५)दगडावर/दगडाच्या मूर्ती घडवणारा-- शिल्पकार
(२६) दगडावर कोरलेले लेख -- शिलालेख
(२७) तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण - तिठा
(२८) न्यायनिवाडा करणारा -- न्यायाधीश
(२९) प्रचंड वेगाने वाहणारा वारा -- वादळ
(३०) सायकलच्या ट्युबमध्ये असणारा
वायू पदार्थ -- हवा.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता. ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment