माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 1 October 2018

थोर नेता - लालबहादूर शास्त्री

     भारत देशाला  ”जय जवान जय किसान”  हा मंत्र देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीचा जन्म २ आक्टोबर १९०४ मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला.त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.

          १९२१ मध्ये लालबहादूरांनी शाळा सोडली व ते असहकारितेच्या चळवळीत सामील झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे फार हाल झाले. पुढे चळवळ संपल्यावर ते काशी विद्यापीठात दाखल झाले. तेथेच त्यांना  'शास्त्री ' ही पदवी मिळाली. 

      पुढे लालबहादूर शास्त्री यांनी उत्तर प्रदेशात देशकार्याला प्रारंभ केला. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते; पण १९५६ मध्ये अरिमालूर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंडितजींच्या मृत्यूनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. 
                        शास्त्रीजींनी पंतप्रधानपदी केवळ
अठरा महिन्यांचा कारभार पाहिला ; पण त्या 
अवधीतही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे दर्शन 
घडवले. परदेशातून अन्नधान्य आणण्याऐवजी 
आठवड्यात एक वेळ उपवास करण्याचा 
संदेश त्यांनी जनतेला दिला.  'जय जवान 
जय किसान ' ही घोषणा देऊन कष्टकरी 
शेतकरी आणि शूरवीर सैनिकांचा गौरव केला. 
असा हा सामान्यांचा विचार करणारा, सामान्यांतून आलेला महान नेता आहे.        
      
=========================      
       संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                      पिंपळनेर, ता. साक्री,जि.धुळे
                    ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment