माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 29 October 2018

संख्या व संख्यांचे प्रकार

(१) नैसर्गिक संख्या :-
      १ पासून सुरू होणाऱ्या सर्व मोजसंख्यांना
      नैसर्गिक संख्या म्हणतात.
        उदा.  १, २, ३, ४.......
-------------------------------------------------
(२) पूर्ण संख्या :-
        नैसर्गिक संख्यांमध्ये ० मिळविल्यास
   तयार होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात.
      उदा.  ०, १, २, ३, ४
    ▪ सर्वात लहान पूर्ण संख्या  ० आहे.
    ▪ सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही.
--------------------------------------------------
(३)  सम संख्या :-
      ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो.  त्या
      संख्येला समसंख्या म्हणतात.
     ▪ समसंख्येच्या एककस्थानी  ०, २, ४, ६, ८.
        यांपैकी एखादा अंक असतो.
--------------------------------------------------
(४) विषम संख्या  :-.
      ज्या संख्येला  २ ने पूर्ण भाग जात नाही.
      त्या संख्येला विषम संख्या म्हणतात.
   ▪ विषम संख्यांच्या एकक स्थानी  १, ३, ५,
     ७, ९ यांपैकी एखादा अंक असतो.
--------------------------------------------------
(५) मूळ संख्या  :-
      ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा
      १ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात. 
    ▪ १ ते १०० पर्यंत एकूण २५ मूळ संख्या आहेत.
   ▪ १ ही मूळ संख्या व संयुक्त संख्या नाही.
   • २ ही एकमेव मूळ संख्या व समसंख्या आहे.
      व इतर मूळ संख्या विषम संख्या आहेत.
   ▪ १ ते १०० पर्यंत  २५ मूळ संख्या आहेत.
     १ ते १०० पर्यंतच्या मूळ संख्या --
       २ , ३ , ५ , ७ , ११ ,  १३ , १७ ,  १९ , २३ , 
      २९ , ३१ , ३७ , ४१ ,  ४३ ,   ४७ ,  ५३ ,    
      ५९ , ६१ ,  ६७ ,  ७३ ,  ७९ ,   ८३ ,  ८९ , ९७ .

--------------------------------------------------
(६) संयुक्त संख्या :-
      दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या
      संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात.
  ▪ १ ही संख्या मात्र मूळ संख्या नाही व संयुक्त
     संख्या सुध्दा नाही.
  ▪  १ ते १०० पर्यंत एकूण ७४ संयुक्त  संख्या आहेत.
=================================
संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                       पिंपळनेर  - साक्री, जि. धुळे
                       ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment