माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 26 October 2018

' हात ' या अवयवांशी संबंधित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ


(१) हात चालणे
---  पटपट काम करणे.

(२ ) हात उगारणे.
---  मारायला प्रवृत्त होणे.

(३) हात आवरणे.
---  मदत थांबवणे.

(४) हात देणे.
---  मदत देणे.

(५) हातावर शीर घेणे.
---  मरण्यास तयार असणे.

(६) हात ओला करणे.
---  लाच घेणे

(७) हातावर हात मारणे.
---  समंती देणे.

(८) हातघाईवर येणे.
---  मारामारी करणे.

(९) हात दाखवणे.
---  सामर्थ्य दाखवणे

(१०) हात धुऊन घेणे
---   स्वार्थ साधणे.

(११) हातखंडा असणे.
---   कौशल्य असणे. .

(१२) हातपाय हलवणे.
---    उद्योग करणे.

(१३) हात दगडाखाली सापडणे.
---    अडचणीत असणे.

(१४) हात पसरणे.
---   भीक मागणे.

(१५) हातावर तुरी देणे.
---    फसवून पळून जाणे.

(१६) हातावर पोट भरणे.
---    अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणे.

(१७) हातपाय मोकळे करणे.
---    फिरायला जाणे.

(१८) हातापाया पडणे.
---    गयावया करणे.

(१९ ) हातपाय गळणे.
---     निराश होणे.

(२०) हात धुऊन पाठीस लागणे.
---    त्रास देणे.   / छळणे.

=========================     

     संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                       पिंपळनेर  - साक्री, जि. धुळे
                       ९४२२७३६७७५

  

2 comments: