(का व कसे )
(१) समुद्राचे पाणी खारट का असते ?
--- समुद्रात विरघळलेल्या अनेक क्षारांमुळे
समुद्राचे पाणी खारट असते.
--------------------------------------------------
(२) साप नेहमी थंड जागी का राहतात ?
--- सभोवतालच्या तापमानानुसार ते शरीराच्या
तापमानात बदल करू शकतात.
---------------------------------------------------
(३) अन्नाचा घास घाईने गिळताना ठसका
का लागतो ?
--- अन्नाचा घास घाईने गिळताना, गिळण्याच्या
क्रियेत सुसूत्रता न राहिल्याने घासातील
अन्नकण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेत
जातो. तो कण बाहेर ढकलून देण्यासाठी
शरीर प्रयत्न करते आणि त्यानेच ठसका
लागतो.
----------------------------------------------------
(४) लाकडी चाकांवर लोखंडाची धाव
चढवताना ती गरम का करतात ?
--- गरम केल्यावर धाव प्रसरण पावते व थंड
झाल्यावर आकुंचन पावून ती लाकडी
चाकावर घट्ट बसते.
-----------------------------------------------------
(५) पाऊस पडण्याच्या आधी आपल्याला
गरम का होते ?
--- सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन तापते. त्यामुळे
जमिनीलगतची हवा गरम होते. गरम
झालेले हवा हलकी असल्याने ती वर जाते.
आकाशात पाण्याने भरलेले ढग जमा
होऊ लागले की, वर गेलेली गरम हवा
उत्सर्जनाने बाहेर जाऊ शकत नाही.
त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते व
आपल्याला गरम होते.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर - साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment