माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 8 April 2019

पाणी ( पाणी म्हणजे जीवन  ! )

      पृथ्वीचा सुमारे ७१ % भाग हा
 पाण्याने व्यापला आहे. समुद्राचे पाणी खारट
असल्याने ते पिण्यासाठी आणि शेतीसाठी
उपयुक्त नसते. नदी, नाले, ओहळ इत्यादींचे
वाहते पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे
जमिनीखाली पाण्याचे स्रोत तयार होतात.
अशा पाण्याला भू - जल म्हणतात.

     विहीर, कूपनलिका, तलाव, नदी हे सर्व पाण्याचे स्रोत आहेत.
  
   ● पाण्याची रूपे  :-
       पृथ्वीवर पाणी तीन अवस्थांमध्ये असते.
विहीर, तलाव, नदी, समुद्र तसेच जमिनीखाली
पाणी द्रवरूपात असते.

      उंच पर्वतांवर बर्फाच्या म्हणजेच स्थायुरूपात पाणी सापडते.

    हवेत वायुरूपात पाणी असते.
    तापमानानुसार पाण्याचे अवस्थांतर घडून
येते.  ० ° से ला (शून्य अंश सेल्सिअसला)
बर्फाचे पाण्यात म्हणजेच स्थायूचे द्रवात, तर
१०० ° से ला पाण्याचे वाफेत म्हणजेच द्रवाचे
वायुरूप अवस्थांतर होते.
        पाण्याचे बाष्पीभवन कोणत्याही
तापमानाला होऊ शकते. उच्च तापमानावर
बाष्पीभवन वेगाने होते.

 ● जलप्रदूषण --
   जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात सांडपाणी
किंवा रासायनिक पदार्थ मिसळले, तर ते
पिण्यायोग्य राहत नाही. विशेषतः उद्योगधंद्यात
वापरलेले पाणी जवळपासच्या पाण्याच्या
स्त्रोतात जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे
दूषित होते. याला जलप्रदूषण म्हणतात.
   पृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग पाण्याने
व्यापला असला, तरीही फक्त तीनच टक्केच
पाणी पिण्यासाठी किंवा इतर उपयोगांसाठी
वापरता येते. पाणी ही एक मौल्यवान नैसर्गिक
संपत्ती आहे.  तिचा वापर फारच काळजीपूर्वक
करणे गरजेचे आहे. पाण्याची टंचाई दूर
करण्यासाठी जलव्यवस्थापन करणे गरजेचे
आहे.

संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment