माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3284670

Friday, 12 April 2019

मेंढालेखा एक वैशिष्ट्यपूर्ण गाव

● मेंढालेखा ---  मेंढालेखा हे महाराष्ट्रातील गडचिरोली
जिल्ह्य़ातील एक गाव आहे. हे गाव
जंगलांनी वेढलेले आहे. या गावाने जंगल
व्यवस्थापनाचा इतिहास घडवला. सर्व गाव
आपल्या रोजच्या गरजांसाठी गावाजवळील
जंगलावर पूर्णपणे अवलंबून होते.
        परंतु १९६० - ६१ या दशकात हे जंगल
कागद कंपन्यांना भाडेकराराने देण्यात आले.
कंपन्यांनी अंदाधुंद कटाई चालू केली. त्यामुळे गावकऱ्यांना जंगलातून मिळणाऱ्या गरजेच्या
वस्तू मिळणे अशक्य होऊ लागले. गावकऱ्यांनी
संघर्ष केला. शेवटी स्थानिक लोकांचे
जंगलावरील अधिकार सरकारने मान्य केले.
       गावाने जंगलाच्या वापराविषयी नियम
बनवले. नियम मोडणाऱ्यास दंड बसवण्यात
आला. जंगल व्यवस्थापनासाठी अभ्यासगट
स्थापन झाले. गस्त पथके जंगलांची निगराणी
व संवर्धन करू लागली.
    जंगल व्यवस्थापन आणि संवर्धनाचे सर्व
निर्णय सर्वानुमते ग्रामसभेत घेतले जाऊ
लागले. मेंढालेखाची स्थानिक प्रशासन आणि
निर्णय व्यवस्था जंगल संवर्धनाचा पाया आहे.
संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment