(१) जंगलात वृक्ष उंच वाढतात.
--- जंगलात वनस्पतींची दाटी असते.
आवश्यक इतका सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी
जंगलात वृक्ष उंच वाढतात.
--------------------------------------------------
(२) वाघाची चाहूल भक्ष्यास लागत नाही.
--- वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी
असते, तो भक्ष्याच्या दिशेने दबकत दबकत
चालतो. त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही.
------------------------------------------------
(३) बदक पाण्यात असताना ओले का होत नाही ?
--- बदकाच्या पंखावर आणि पिसांवर तेलकट
थर असल्याने त्यावरून पाणी ओघळून जाते.
म्हणून पाण्यात बदक ओले होत नाही.
-------------------------------------------------
(४) समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते ?
--- समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात.
त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते.
--------------------------------------------------
(५) सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का लावलेला असतो ?
--- काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो,
म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून
काळा रंग लावलेला असतो.
-------------------------------------------------
(६) उन्हात क्रिकेट खेळतांना पांढरे कपडे
का घालतात ?
--- पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत,
म्हणून उन्हात क्रिकेट खेळतांना पांढरे कपडे घालतात.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment